World Chocolate Day : चॉकलेटचा इतिहास काय? चॉकलेट खाणं फायद्याचं का आहे?

0
396

दरवर्षी ७ जुलैला जागतिक चॉकलेट दिन साजरा केला जातो. चॉकलेट हा असा प्रकार आहे की क्वचितच कोणाला आवडत नाही असे असेल. चॉकलेट प्रत्येकाच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी भेट म्हणून हमखास चॉकलेट दिले जाते. भारतात चॉकलेटचं नातं एखाद्या चांगल्या गोष्टीशी किंवा साजरा करायच्या क्षणासोबत जोडलेलं आहे. छोट्या पासून मोठ्या सेलिब्रेशनला, आनंदाच्या क्षणाला चॉकलेटची हजेरी असते. नात्यात गोडवा वाढवण्यासाठी त्यांना एकत्र आणतो तसेच प्रियजन आणि मित्रांसाठी कुठल्याही प्रसंगी चॉकलेट भेट केल्याने सर्व प्रकारच्या चिंता, दुःख आणि गैरसमज दूर करण्यात मदत करतो

चॉकलेटचा इतिहास

असं म्हणतात की, चार हजार वर्षांपूर्वी चॉकलेटचा म्हणजे ज्या बियांपासून चॉकलेट बनवलं जातं, त्याचा शोध लागला. याचं झाड सगळ्यात आधी अमेरिकेत पाहिल्याचं सांगितलं जातं. या झाडाच्या फळांच्या बियापासून चॉकलेट बनवलं. सुरुवातीला अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये यावर प्रयोग झाले. त्यानंतर 1528 मध्ये स्पेनच्या राजाने मेक्सिकोवर ताबा मिळवला. तिथे राजाला ‘कोको’ फार आवडलं आणि त्यानंतर राजाने कोकोच्या बिया मेक्सिकोतून स्पेनमध्ये आणल्या. तेव्हापासून तिथे चॉकलेट प्रचलित झालं, असं सांगितलं जातं.

तर काही जणांच्या मते सुरुवातीला चॉकलेट विशिष्ट प्रदेश आणि देशांपुरते मर्यादित होते. १५५० साली युरोपमध्ये पहिल्यांदा चॉकलेटचा शोध लागला आणि हळू हळू चॉकलेट सगळीकडेच परिचयाचे झाले. जिथे जिथे चॉकलेट पोहोचले तिथे ते लोकांचे आवडते बनले. १५१९ साली स्पॅनिश एक्सप्लोरर हर्नन कोर्टीस यांना अॅझटेक सम्राट माँटेझुमा यांनी ‘झोकोल्टल’ नावाचे चॉकलेट आधारित पेय दिले असे म्हणतात. हर्नन कोर्टीस यांनी त्याच्याबरोबर पेय परत स्पेनला घेऊन जाऊन चव सुधारण्यासाठी त्याला व्हॅनिला, साखर आणि दालचिनीची जोड दिली. स्पॅनिश आक्रमणानंतर १६०० च्या दशकात या पेयाला इंग्लंड आणि फ्रान्समध्ये लोकप्रियता मिळाली. खाता येतील अशी सॉलिड चॉकलेट केवळ १८०० च्या दशकात तयार करायला सुरवात झाली. हळूहळू बर्‍याच चॉकलेट आधारित रेसिपी जगभरात रूप घेऊ लागल्या आणि चॉकलेटचे विविध प्रकारचे पदार्थ बनू लागले.

चॉकलेटबद्दल रंजक गोष्टी!
१. अ‍ॅझटेक (Aztec) संस्कृतीत चॉकलेट केवळ एक चवदार, कडू पेय नव्हते तर त्याचा वापर चलन म्हणून केला जात असे.

२. जगातील तब्बल ३०% कोको आफ्रिकेत पिकवला जातो. कोको हा चॉकलेटमधला सर्वात प्रमुख घटक आहे.

३. व्हाइट चॉकलेट डे (२२ सप्टेंबर), मिल्क चॉकलेट डे (२ जुलै), चॉकलेट कव्हर्ड एनिथिंग डे (१६ डिसेंबर), बिटरस्वीट चॉकलेट डे (१० जानेवारी) असेही चॉकलेटसाठीचे इतर दिवस आहेत.

४.एक पौंड चॉकलेट तयार करण्यासाठी ४०० कोको बीन्स लागतात आणि प्रत्येक कोकाऊ झाडावर एका वेळी अंदाजे २५०० बीन्स तयार होतात.

चॉकलेट खाण्याचे फायदे

  • चॉकलेटमुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदे होतात. यामधील नैसर्गिक तत्वे आपल्याला आनंदी आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतं. विशेषत; चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन आपल्याला आनंदी आणि मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं. चॉकलेटचं सेवन आपल्या हृदयासाठी सुद्धा उत्तम ठरतं. ‘डार्क चॉकोलेट’ खाण्यामुळे हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
  • चॉकलेट तणाव कमी करण्यात फायदेशीर : चॉकलेटमध्ये ऑक्सिडेटिव्ह असते, ज्यामुळे ताण-तणाव कमी होण्यास खूप मदत मिळते.
  • वजन कमी करण्यात उपयुक्त : एका संशोधनात असे आढळून आले आहे की नियमितपणे चॉकलेट खाल्ल्याने ते बॉडी मास इंडेक्स व्यवस्थित ठेवू शकते.
  • कोलेस्टेरॉलवर नियंत्रण : डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे पॉलीफेनॉल शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदा होतो.