जागतिक हास्य दिन 2021: हसताय ना… हसलच पाहिजे; हसा आणि हसवत राहा!

0
1576

हास्य हे प्रभावी औषध आहे, ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो असतो आनंदी, उत्साही आणि प्रेमळही! म्हणूनच रोजच्या जगण्यातल्या ताण-तणावांवर मात करण्यासाठी हास्याचं टॉनिक घ्यायलाच हवं. जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) प्रत्येक वर्षाच्या मे मध्ये पहिल्या रविवारी असतो. पहिला जागतिक हास्य दिन 10 जानेवारी 1998 रोजी भारतातील मुंबई येथे झाला आणि जगभरातील जागतिक हास्य दिन योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांना या स्थापना चे श्रेय जाते.

का साजरा करतात हास्य दिन?

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा करण्यात येतो. या दिवसाच सुरुवात मुंबईमधूनच झाली होती. हा दिवस सर्वात आधी 10 मे 1998 या दिवशी डॉ.मदन कटारिया यांनी साजरा केली होता. आज दिवसभरामध्ये जवळपास 100 देशांमध्ये मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे, लोकांना हसण्याच्या फायद्यांबाबत जागरूक करणे हाच आहे.

हसायलाच पाहिजे कारण!
आपल्याकडे दोन पर्याय असतात एक म्हणजचे धीर-गंभीर लोकांसोबत जगणे आणि दुसरा म्हणजे जिवंत राहून एकदम हसून सजीव वैक्ती बर राहणे तुम्हाला कोणता पर्याय बरोबर वाटतोय? नक्की दुसराच ना! खूप जन हेच पसंद करतील कारण “ज़िंदगी ज़िंदादिली का नाम है, मुर्दादिल क्या खाक जिया करते हैं” म्हणूनच हसणे फार महत्वाचे आहे. एक दिवस जगभरात हसण्यासाठी समर्पित आहे. जीवनात निरोगी रहाण्यासाठी नेहमीच हसत राहिले पाहिजे. खाताना हसा, कारण जेवताना हसल्याने जेवण सुद्धा चवदार लागेल कारण ख़ुशी सर्वाना प्यारी असते.

जागतिक हास्य दिनाचे फायदे काय?

हसण्याचे बरेच फायदे आहेत, खालीलप्रमाणे पाहू शकता:

  • हास्य किंवा विनोद ही एक सकारात्मक आणि सामर्थ्यवान भावना आहे, ज्यामध्ये सर्व घटक एखाद्या व्यक्तीस ऊर्जावान आणि शांत बनवतात.
  • सर्व रोग हसण्याने निघून जाऊ शकतात.
  • मानसशास्त्रीय प्रयोगांनी असे सिद्ध केले आहे की जी मुले जास्त हसतात ती अधिक हुशार असतात.
  • हसण्यामुळे ऑक्सिजनचे अभिसरण वाढते आणि दूषित हवा काढून टाकते.
  • नियमितपणे हसणे शरीराच्या सर्व घटकांना मजबूत करते.
  • जगातील आनंद आणि दु: ख दोन्ही सूर्यप्रकाशासारखे येतात आणि जातात.
  • वजन वाढण्यासाठी जास्त खाणे आणि तणाव या गोष्टी जबाबदार असतात. आनंदी आणि हसमुख राहिल्याने तणाव वाढत नाही .त्याप्रमाणे चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही परिणामी वजन नियंत्रणात राहते.
  • हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिस हा फील गुड करणारा घटक क्रियाशील झाल्याने विविध भागात होत असलेले दुखणे कमी होते. हा रासायनिक घटक पेन किलरप्रमाणे काम करत असतो.
  • हसण्याने हार्ट रेट कमी होतात आणि याने शरीराला आराम मिळतो. जे लोक खूप हसतात त्यांना हृदयरोग होण्याचा धोका कमी असतो. तसेच याने ब्लड प्रेशरही कमी होतं.

आता सध्या या कोरोना संकटामध्ये सर्वत्र नकारात्मक वातावरण असताना हसणं गायब झालं आहे. तर या जागतिक हास्य दिनाच्या दिवशी आपण खळखळून हसण्याचा संकल्प करूया व इतरांनाही हसवूूया व आपले जीवन निरोगी आणि आनंदमयी करूया एवढीच अपेक्षा!

चला तर मग हसुया आणि हसवुया
कोरोनाच्या संकटावर मात करूया