दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघा दोषींना उद्या फाशी देण्याची तयारी झाली होती. पण दोषींपैकी एक असलेल्या पवनने राष्ट्रपतींकडे दया याचिका केलीय. या याचिकेवर निर्णय झालेला नाही. यामुळे चौघांना उद्या होणारी फाशी टळली आहे. पुढील आदेश येईपर्यंत दोषींच्या फाशीवर दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टने स्थगिती दिलीय.
चारही दोषींविरोधात दिल्लीतील न्यायालयाने ७ जानेवारीला पहिल्यांदा डेथ वॉरंट जारी केले होते. त्यांना २२ जानेवारीला फाशी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. पण नंतर फाशीची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पण त्यावेळीही फाशीची अंमलबजावणी ३१ जानेवारीला आणखी पुढे ढकलण्यात आली. आता या चारही दोषींना ३ मार्चला फाशी देण्याचे निश्चित करण्यात आले होते.
आपल्याला फाशीऐवजी जन्मठेप देण्यात यावी अशी याचिका पवन कुमारने केली होती. ती कोर्टाने फेटाळल्यानंतर त्याने राष्ट्रपतींकडे दया याचना केली. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे निर्भयाच्या आरोपींना फाशी होणारच हे निश्चित झालं होतं. मात्र दिल्ली कोर्टाच्या निर्णय़ामुळे चारही दोषींची उद्या होणारी फाशी टळली आहे.आता पुन्हा एक नवं डेथ वॉरंट काढण्यात येईल आणि फाशीची तारीख निश्चित करण्यात येईल.
कोर्टाला आणि प्रशासनाला येईल का जाग?
निर्भयाला न्याय कधी मिळणार ? मिळेल का नाही असे कित्येक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये सुरु आहे. आपल्या देशातील यंत्रणा ईतकी शांत आणि हळू का आहे हे सुद्धा कळत नाही आहे. जर अशा गोष्टी वारंवार होत राहिल्या तर गुन्हेगार मस्तपैकी मोकाट फिरत राहतील आणि कित्येक निर्भया आणि त्यांच्या कुटुबीयांना ह्याची शिक्षा होत राहील देव जाणे.
लवकरच जलद गतीने निर्णय घ्यावा आणि दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी आशा सर्व भारतीय करत आहे आणि खासकरून प्रत्येक मुलींच्या पालकही ही आशा बाळगून आहे.