भारताची चीनवर डिजिटल सर्जिकल स्ट्राईक; ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी

0
406

पूर्व लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर सीमेवर तणाव असून, देशातून चीनला उत्तर देण्याचा सूर उमटत आहे. केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

भारतीय सार्वभौमत्व, संरक्षणाबद्दल, एकात्मतेबद्दल पूर्वग्रह दूषित असल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने याबाबतचे कठोर पाऊल उचलले आहे. डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याचे बोललं जात आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, TikTok, Shareit, UC Browser, Helo, Mi Community, YouCam makeup, Clash of Kings या अ‍ॅपचा या यादीत समावेश आहे.

सीमेवरील तणाव व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी चिनी अ‍ॅपविषयी दिल्यानंतर केंद्रानं ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचं हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९अ च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपची यादी
टिकटॉक
शेअरइट
क्वाई
यूसी ब्राऊजर
बैदू मॅप
शीन
क्लॅश ऑफ किंग्स
डीयू बॅटरी सेव्हर
हॅलो
लाइकी
यूकॅम मेकअप
मी कम्युनिटी
सीएम ब्राऊजर
व्हायरस क्लीनर
एपीयूएस ब्राऊजर
रोमवी
क्लब फॅक्टरी
न्यूजडॉग
ब्युटी प्लस
वीचॅट
यूसी न्यूज
क्यूक्यू मेल
वीबो
झेंडर
क्यूक्यू म्युझिक
क्यूक्यू न्यूजफीड
बिगो लाईव्ह
सेल्फी सिटी
मेल मास्टर
पॅरलल स्पेस
वीसिंक
इएस फाईल एक्सप्लोरर
व्हीवो व्हीडिओ – क्यू यू व्हीडिओ इंक
मेंतू
व्हीगो व्हीडिओ
मी व्हीडिओ कॉल – शाओमी
न्यू व्हीडिओ स्टेटस
डीयू रेकॉर्डर
व्हॉल्ट – हाईड
कॅशे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ
डीयू क्लीनर
डीयू ब्राऊजर
हागो प्ले वीथ न्यू फ्रेंड्स
कॅम स्कॅनर
क्लीन मास्टर – चीताह मोबाईल
वंडर कॅमेरा
फोटो वंडर
क्यूक्यू प्लेअर
वी मीट
स्वीट सेल्फी
बायडू ट्रान्सलेट
व्हीमेट
क्यूक्यू इंटरनॅशनल
सिक्युरिटी सेंटर
क्यूक्यू लॉन्चर
यू व्हीडिओ
व्ही फ्लाय स्टेटस व्हीडिओ
मोबाईल लिजंड्स
डीयू प्रायव्हसी
सरकारनं बंदी घातल्यामुळे आता ऍन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्ले स्टोरमधून हे अॅप्स भारतात हाटवले जातील.

दरम्यान भारत सरकारनं लोकांना या ऍप्सला अनइनस्टॉल करण्याचं आवाहन मात्र केलेलं नाही. त्यामुळे लोकांना त्यांची इच्छा असेपर्यंत हे त्यांच्या फोनमध्ये कायम राहू शकतील. त्यांना मॅन्युअली हटवल्यानंतरच ते जाऊ शकतील. पण लोकांना आता हे अॅप अपडेट करता येणार नाहीत.