धन्यवाद भारत : ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी मानले मोदींचे आभार

0
231

कोरोना व्हायरस या सध्याच्या मोठ्या संकटातून जगाची सुटका करण्यासाठी भारतानं पुढाकार घेतला आहे. भारतानं यापूर्वीच शेजारच्या देशांना कोरोना व्हॅक्सिन पाठवलं आहे. त्यापाठोपाठ भारतानं आता ब्राझीलला (Brazil) देखील हे औषध पाठवलं आहे. ब्राझीलचे अध्यक्ष जेअर बोलसोनारो (Jair Bolsonaro) हे यामुळे चांगलेच आनंदी झाले आहेत. कोरोना व्हॅक्सीन भारतातून ब्राझीलला रवाना झाल्यानंतर राष्ट्रपती बोलसोनारे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. यासोबतच त्यांनी हनुमानाचे एक फोटो शेअर केले आहे.

ब्राझीलच्या राष्ट्रपतींचं ट्विट
ब्राझीलचे राष्ट्रपती जैर एम बोलसोनारोने ट्विट करताना लिहिलं आहे की, ”नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी. ब्राझील या महामारीच्या काळात तुम्ही दिलेली साथ खूप मोलाची आहे. कोरोना लस ब्राझीलला पोहोचल्यानंतर त्यांना आभार मानले आहेत.

पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या ट्विटला प्रतिसाद दिला आहे.

बोलसोनारोजी, कोविड महामारीविरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी ब्राझीलचा विश्वासू सहकारी होणं हा आमचा सन्मान आहे. आरोग्यसेवांवरील आपलं सहकार्य भारत बळकट करत राहिलं, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

भारत सरकारनं आतापर्यंत बांगलादेशात 20 लाख तर नेपाळमध्ये 10 लाख कोरोना व्हॅक्सिनचे डोस पाठवले आहेत. तर भूतान आणि मालदीव यांना अनुक्रमे दीड लाख आणि एक लाख डोस पाठवून भारतानं मदत केली आहे. भारतीय व्हॅक्सिनला जगभर जबरदस्त डिमांड आहे. जवळपास 92 देशांनी भारताकडून कोरोना व्हॅक्सिन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.