Hindi Diwas 2020: हिंदी दिवस साजरा करण्यामागचे महत्त्व काय आहे?

0
491

हिंदी की बिंदी लागे सबसे प्यारी, हिंदी हम सबकी दुलारी
हिंदी भाषा सबसे न्यारी, भारत वासियों को है हिंदी प्यारी।

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ सप्टेंबर १९४९ रोजी, संविधान सभेत एक प्रस्ताव संमत करून ‘हिंदी’ला देशाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी १४ सप्टेंबर ‘हिंदी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हिंदी दिवस साजरा करण्यामागे इंग्रजीचे वाढते महत्व लक्षात घेत हिंदीविषयी जनजागृती करणे , हिंदी विषयी आदर निर्माण करणे, हिंदीचा वापर लहानांमध्ये जास्त करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे.

भारत हा विविधतेमध्ये एकता जपणारा देश आहे. या देशात जशी संस्कृती बदलते तशी भाषादेखील बदलते मात्र उत्तर भारतासह बहुसंख्य राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलाली जाते. आज युवावर्गात इंग्रजी आणि इतर विदेशी भाषा शिकण्याचे वेड लागले आहे. त्यामुळे या सर्वांत हिंदीचे महत्व टिकून ठेवण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन हिंदी विषयी आदर निर्माण करणे फार जरूरी आहे. आपण सर्वांना हिंदीवर गर्व असावा. देशभरात हिंदी बोलण्यात केव्हाही कोठेही लाज वाटायला नको असे जर होत असेल तर हा आपल्या राष्ट्राचा अपमान मानल्या जाईल. त्यासाठी सामान्यांमध्ये देशाप्रती जागृती निर्माण करणे आणि हिंदीचे महत्व समजावून सांगणे या करीता हिंदी दिवसाची संकल्पना तयार झाली.

ज्या प्रमाणे आपण राष्ट्राच्या विविध प्रतिकांचे योग्य तो आदर सत्कार करतो त्याच प्रकारे देशाची एक प्रमुख भाषा ज्यास आपण राष्ट्रभाषा म्हणतो तर हिंदी आपली अप्रत्यक्षरित्या राष्ट्रभाषा आहे त्यामुळे तिचा सन्मान नक्कीच व्हायला पाहीजे प्रत्येक नागरीकांचे परम कर्तव्य आहे की आपल्या राष्ट्रभाषेचा आदर करावा. हिंदी दिवस हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी खऱ्या अर्थाने हिंदी विषयी आपले प्रेम आपण सर्वांसमोर अभिप्रेत करू शकतो. हिंदीच्या अंगीकाराने कोणकोणते फायदे होवू शकतात त्याचा राष्ट्रविकासात कसा सहभाग होऊ शकतो तसेच आपल्या सर्वांमध्ये राष्ट्रभावना कशी निर्माण केली जाते हा हिंदी दिवस साजरा करण्याचा प्रमुख उद्देश आहे.

हिंदी दिवसानिमित्त खास बाबी जाणून घ्या…

  • भारताच्या उत्तरेकडील राजस्थान, उत्तर-प्रदेश, हरियाणा, दिल्ली, बिहार, झारखंड, छत्तीगढ़, मध्य-प्रदेशातील लोकांची हिंदी बोली भाषा आहे.
  • हिंदी भाषा भारतच्या 22 भाषांमधील एक आहे, हिंदी भाषेचा उपयोग विविध वर्गातील लोक करतात.
  • इंग्रजी भाषेतील अवतार, बंग्लो, जंगल, खाकी, कर्म, लूट, मंत्र, निर्वाण, शैंपू, ठग, योग, गुरु आदी शब्द हिंदीतून घेतले आहेत.
  • 1805 मध्ये प्रकाशित झालेली श्रीकृष्ण पर आधारित पुस्तक ‘प्रेम सागर’ ला हिंदीमध्ये लिहिण्यात आलेले पहिले पुस्तक मानले जाते.
  • देशात पहिल्यांदा हिंदी भाषेचा कार्यालयीन भाषा म्हणून बिहार सरकारने अवलंब सुरू केला.
  • देशात एकूण २२ भाषांना राजभाषांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यापैकी हिंदी आणि इंग्रजी भाषेचा अधिकृत रित्या केंद्रीय पातळीवर वापर केला जात आहे.
  • देशातील सुमारे ७७ टक्के लोकं हिंदी बोलतात. सुमारे 27 कोटी लोकं इंग्रजी भाषेचा उपयोग करतात.
  • राजेंद्र सिंह यांनी अमेरिकेतील विश्व सर्वधर्म सभा संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व करताना हिंदी भाषेत भाषण दिले होते. त्याचे लोकांनी खूप कौतुक केले होते.
  • हिंदी ही जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा. भारतामध्ये 43.63% लोकं हिंदी बोलतात आणि देशात हिंदी भाषिकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
  • 2021 साली इंटरनेटवर इंग्रजीच्या तुलनेत हिंदीचा वापर करणार्‍यांची संख्या वाढू शकते. सुमारे 20.1 कोटी लोकं हिंदीचा वापर करू शकतात. गूगलच्या माहितीनुसार, हिंदी भाषेत माहिती वाचणारे प्रतिवर्षी 94% नी वाढत आहेत तर इंग्रजी वाचणार्‍यांचा दर 17% आहे.
  • जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये टॉप 5 भाषांमध्ये हिंदीचाही समावेश आहे.
  • दक्षिण पॅसिफिक मधील मेलानेशिया मधील फिजी नावाच्या आयलंडची हिंदी ही आधिकारिक भाषा आहे. त्याचा लहेजा अवधी, भोजपुरी प्रमाणे आहे.
  • जगात पाकिस्‍तान, नेपाळ, बांग्‍लादेश, अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी, न्‍यूजीलैंड, संयुक्‍त अरब अमीरात, युगांडा, गुयाना, सूरीनाम, त्रिनिदाद, मॉरिशस, साउथ अफ्रीका समवेत अनेक देशांत हिंदी भाषिक आढळतात.
  • जगात 10 जानेवारी दिवशी ‘विश्व हिंदी दिवस’ देखील साजरा केला जातो. भारतामध्ये असलेली विविधतेत एकता यादिवशी जपली जाते.

हिंदी है भारत की आशा
हिंदी है भारत की भाषा
हिंदी दिवस पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं…!!