Indian Air Force Day 2021: भारतीय हवाई दल जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दल

0
942

भारतीय नागरिकांसाठी आठ ऑक्टोबर हा दिवस खूप महत्वाचा आहे. या दिवशी भारतीय हवाई दल दिवस साजरा केला जातो. यावर्षी भारतीय हवाई दलाचा ८९ वा स्थापना दिवस साजरा केला जाईल. भारतीय हवाई दल जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांपैकी एक आहे.

वायुसेना दिवसाचे महत्व
आज हिंडन एअरबेसवर देशाच्या जुन्या आणि आत्याधुनिक विमानांच्यासोबत भारतीय वायुसेनेचे जवान चित्तथरारक एअर शो करतात. वायुसेनेबद्दल लोकांना माहिती देणे आणि देशाच्या हवाई सीमांच्या सुरक्षेसाठी भारतीय हवाई दलाचे कार्य दर्शवणे हे वायुसेना दिवस साजरा करण्यामागचे कारण आहे.

काय आहे दिवसाचा इतिहास?
हवाई दलाची स्थापना आठ ऑक्टोबर १९३२ रोजी झाली, म्हणून दरवर्षी ८ ऑक्टोबर रोजी हवाई दल दिवस साजरा केला जातो. देश स्वतंत्र होण्यापूर्वी हवाई दलाला रॉयल इंडियन एअर फोर्स (आरआयएएफ) म्हटले जात असे. स्वातंत्र्यानंतर, “रॉयल” हा शब्द काढून “भारतीय हवाई दल” वर करण्यात आला.

भारतीय वायुसेनेचा इतिहास
असे मानले जाते की 1 एप्रिल 1933 मध्ये भारतीय वायुसेनेच्या पहिल्या पथकाची निर्मिती झाली. ज्यामध्ये 6आरएफ-ट्रेंड ऑफिसर आणि 19 जवान सामिल होते. तसेच दुसऱ्या विश्व युद्धाच्या दरम्यान भारतीय वायुसेनेने महत्वपूर्ण भूमिका साकारली. देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय वायुसेनेने एकूण 5 युद्धांमध्ये सहभाग घेतला. यामधील 4 युद्ध ही पाकिस्तानसोबत तर 1 चिनसोबत होते. तसेच वायुसेना महत्वाच्या ऑपरेशन्समध्ये देखील भाग घेते. ज्यामध्ये ऑपरेशन विजय, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन कॅक्टस आणि बालाकोट एयर स्ट्राइक यांचा समावेश होतो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय हवाई दलाने आतापर्यंत एकूण 5 युद्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यापैकी चार युद्धे पाकिस्तान विरुद्ध तर एक चीन विरुद्ध लढली गेली आहेत.

कोण होते हवाई दलाचे पहिले प्रमुख?
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी हवाई दल केवळ लष्कराखाली काम करायचे. लष्करातून हवाई दलाला ‘मुक्त’ करण्याचे श्रेय भारतीय हवाई दलाचे पहिले कमांडर-इन-चीफ, एअर मार्शल सर थॉमस डब्ल्यू. एल्महर्स्ट यांना जाते. स्वातंत्र्यानंतर, सर थॉमस डब्ल्यू. एल्महर्स्ट यांना भारतीय हवाई दलाचे पहिले प्रमुख, एअर मार्शल बनवण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ ते २२ फेब्रुवारी १९५० पर्यंत ते या पदावर राहिले.

भारतीय हवाई दलाचे ब्रीदवाक्य
भारतीय वायुसेनेचे बोधवाक्य ‘नभ: स्पृशं दीप्तम’ असं आहे. हे गीतेच्या अकराव्या अध्यायातून घेतले गेले आहे. महाभारत युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रात भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलेल्या प्रवचनाचा एक उतारा आहे.