Farmer Protest : विदेशी सेलेब्रिटींना परराष्ट्र मंत्रालयाचं खरमरीत उत्तर; देशाच्या एकजुटीसाठी बॉलिवूडही सरसावले

0
251

जधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने आता देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. शेतकरी आंदोलनासंदर्भात आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाच्या ट्विटनंतर खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनालापाठिंबा देणाऱ्या कमेंट्स आणि पोस्ट्स काही विदेशी सेलेब्रिटी करत आहेत. त्यांची कानउघाडणी करणारं एक निवेदन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of external affairs) प्रसिद्ध केलं आहे.

काय आहे निवेदन?

भारतीय संसदेने पूर्ण चर्चा आणि वादविवादानंतर कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करणारं विधेयक संमत केलं. या कायदेशीर सुधारणांमुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजापेठेचा फायदा मिळेल आणि त्यातून व्यावसायिक लवचिकता वाढेल. याद्वारे अधिक फायदेशीर आणि पर्यावरणपूरक शाश्वत पद्धतीने शेती करण्याला वाव मिळेल.

भारतातल्या शेतकऱ्यांपैकी अगदी थोड्यांचा या कृषी सुधारणांना आक्षेप आहे. आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांच्याबरोबर चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. केंद्रीय मंत्री या चर्चांमध्ये सहभाग होत आहेत आणि कित्येक चर्चेच्या फेऱ्या आतापर्यंत झाल्या आहेत.

भारत सरकारने सध्या काही काळापुरतं या कृषी कायद्यांना स्थगिनी देण्याचंही मान्य केलं आहे. स्वतः भारतीय पंतप्रधानांनी याबाबत पुढाकार घेत सद्यस्थितीत तोडगा निघेपर्यंत कृषी कायदे अंमलात न आणण्याचं ठरवलं आहे.

यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाने असं म्हटलं आहे, की शेतकरी आंदोलनाच्या आड एक स्वार्थी गट आपला अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकरील आंदोलनाला रुळावरून उतरवणं खरंच दुर्भाग्यपूर्ण आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटलं की, “अशा विषयांवर टिप्पणी करण्यापूर्वी आपण वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं योग्यप्रकारे निरसन होणं आवश्यक आहे. भारतीय संसदेने पूर्णपणे चर्चा केल्यानंतर कृषी क्षेत्राशी संबंधित सुधारवादी कायदे मंजूर केले आहेत.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने असंही म्हटलं आहे की, ‘देशातील एक गट आपल्या स्वार्थासाठी भारताविरूद्ध आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा बाह्य घटकांशी संगनमत करुन जगातील विविध भागात महात्मा गांधींच्या पुतळ्याचं नुकसान केलं जात आहे. हे समस्त भारतासाठी आणि प्रत्येक ठिकाणच्या सुसंस्कृत समाजासाठी अतिशय त्रासदायक आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनाला बॉलिवूडचा पाठींबा

आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा जाहीर केल्यानंतर त्यांची कानउघाडणी करणारं एक निवेदन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of external affairs) प्रसिद्ध केलं. त्यावर भारतीय सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षय कुमार, अजय देवगण, करण जोहर, सुनील शेट्टी असे बरेच सेलिब्रिटी व्यक्त झाले आहेत.

शेतकरी हा आपल्या देशाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मतभेद निर्माण केले जात आहेत त्याकडे लक्ष देण्याऐवजी जो ठराव झाला आहे, त्याचं समर्थन करूया”, असं ट्वीट अक्षय कुमारनं केलं आहे.

तर “भारतविरोधी किंवा भारताच्या पॉलिसीविरोधात कोणत्याही चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. या घडीला कोणत्याही आपासातील वादाशिवाय एकवटण्याची गरज आहे”, असं अजय देवगण म्हणाला.