Miss Universe 2021 हरनाझ कौर संधू : २१ वर्षांनी भारताने जिंकला Miss Universe 2021 चा ताज

0
674

मिस युनिव्हर्स होणं हे जवळपास प्रत्येक तरुणीचं स्वप्न असेल. मात्र, इथपर्यंतचा प्रवास अतिशय कठीण, खडतर आणि तितक्याच संघर्षाचा असतो. नुकतंच मिस युनिव्हर्स 2021 मध्ये भारताने मोठी कामगिरी केली आहे. मिस युनिवर्स 2021’चा खिताब भारताच्या हरनाझ संधूनं जिंकलाय. २१ वर्षीय हरनाझला १२ डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे. तिच्या आधी २१ वर्षांपूर्वी लारा दत्ताने २००० साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता.

हरनाझ कौर संधू हिनं 70 व्या मिस यूनिव्हर्सच्या मुकुटावर स्वत: चं नाव कोरलं आहे. इस्रायलमध्ये 12 डिसेंबरला मिस यूनिव्हर्स स्पर्धा पार पडली. पंजाबची राहणारी हरनाझ कौर हिनं तब्बल 21 वर्षांनी मिस यूनिव्हर्सचा किताब देशाला मिळवून दिला आहे. संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे मिस युनिव्हर्स स्पर्धेला जज म्हणून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Bollywood Actress Urvashi Rautela) हिला संधी मिळाली होती.

कोण आहे हरनाझ संधू?

चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तीने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. २०१८ मध्ये, तिला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला. ती पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.

हरनाजने मिळवलेले किताब
2017 – टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगड
2018 – मिस मॅक्स इमर्जिंग स्टार
2019 – फेमिना मिस इंडिया पंजाब
2021 – मिस युनिवर्स इंडिया