केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कोरोना लसीसंदर्भात सकारात्मक संकेत दिलेयत. पंतप्रधानांनी कोरोना वॅक्सीनवर काम करणाऱ्या तीन कंपन्यांशी व्हर्चुअली बोलणी करत आणि वॅक्सिन बनवण्यासंदर्भात महत्वाची चर्चा झाली. पुण्याची जेनोवा बायो फार्मास्युटिकल्स लिमिटेड, हैदराबादची बायलॉजिकल ई लिमिटेड आणि डॉ. रेड्डीज यांची लॅबोरेट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात आहे. यांचा डेटा आणि निकाल पुढील वर्षाच्या सुरुवातीस येण्याची अपेक्षा आहे. या चर्चेवेळी सर्वसामान्यांना लसीच्या परिणामांसारख्या गोष्टी पटवून देण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी त्यांना दिला. या चर्चेत लसीच्या डिलीवरीचे लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्ट आणि कोल्ड चेन या विषयांवरही चर्चा झाली.
मोदींनी लस कंपन्यांकडून सूचना मागवल्या
पंतप्रधान मोदींनी या कंपन्यांच्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच लस विकासाच्या प्लॅटफॉर्मबाबत चर्चा केली. पंतप्रधानांनी तिन्ही कंपन्यांना लस मंजुरीशी संबंधित प्रक्रिया व इतर बाबींबाबत सूचना देण्यास सांगितले. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार मोदींनी संबंधित विभागांना सांगितले की, लस बनवणाऱ्या कंपन्यांसोबत मिळून त्यांचे प्रश्न सोडवावेत. जेणेकरून त्यांच्या प्रयत्नांचे फळ त्यांना मिळू शकेल.
दरम्यान, पंतप्रधानांनी शनिवारी वॅक्सिन तीन कंपन्यांचा दौरा केला होता. पंतप्रधानांनी पुण्यातील सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडीया संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांनी लसीकरणासाठी सुरु असेलेले प्रयत्न, तयारी, आव्हान आणि भविष्यातील रोडमॅपची माहिती घेतली. ते अहमदाबादच्या जायडस बायोटेक पार्क आणि हैदराबादच्या भारत बायोटेक संस्थेत गेले आणि कोविड लसीकरणाच्या प्रगतीसंदर्भात माहिती घेतली.
लवकरात लवकर वॅक्सिन विकसित करुन कोरोनाशी लढताना निष्काळजीपणा होऊ नये असे आवाहन पंतप्रधानांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हटले. साधारण १ वर्षापूर्वी आपल्याला कोरोना केस संदर्भात कळालं होतं. आतापर्यंत साऱ्या जगात चढउतार पाहायला मिळाले. लॉकडाऊनमधून बाहेर पडून आता वॅक्सिनवर चर्चा होऊ लागलीय. पण आता निष्काळजीपणा करुन चालणार नाही. ही लढाई आणखी मजबूत करावी लागेल असे पंतप्रधान म्हणाले.