आयकर नियमात 1 एप्रिलपासून होणार हे बदल, वाचा कोणत्या नियमात होणार बदल

0
589

यंदाच्या देशाच्या अर्थसंकल्पात आयकरबाबत कोणतीही विशेष घोषणा करण्यात आली नाही. मात्र टॅक्सशी संलग्न नियमात काही बदल करण्यात आलेत. हे नवे नियम 1 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे करदात्यांना काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही या नियमांबाबत जाणून आधीच प्लॅन करु शकता. या अर्थसंकल्पात इनकम टॅक्स नियमांसह आयटीआर भरण्याबाबतही काही बदल करण्यात आलेत.

EPF मध्ये बदल
या वर्षीपासून आता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी EPF म्हणजे कर्मचारी भविष्य निधीवरही कर लावायची घोषणा केली होती. उद्यापासून लागू होणाऱ्या नव्या नियमामध्ये, 2.5 लाख रुपयांच्या पेक्षा जास्त पीएफवर मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कर द्यावा लागणार आहे. ज्यांचे पगार जास्त आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयकर भरायला सोपं
या नव्या नियमानुसार आता आयकर भरण्यामध्ये अधिक सुलभता येणार आहे. आयकर भरणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेऊन सरकारने टॅक्स रिटर्न फाईल करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. तसेच आयटीआर फाईल करणेही सोपं झालं आहे.

TDS दुप्पट होणार
केंद्र सरकार आयटीआर फाईलिंग करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. जे लोक आयटीआर फाईल करणार नाहीत त्यांना दुप्पट TDS द्यावा लागेल असं केंद्राने स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने आयकर कायद्यामध्ये नवीन सेक्शन 206B जोडले आहे. त्यानुसार आता आयटीआर फाईल न केल्यास 1 एप्रिलपासून दुप्पट TDS भरावा लागणार आहे.

नविन उद्योगांसाठी टॅक्स हॉलिडे
या अर्थसंकल्पात सरकारने नवीन उद्योगांना प्रेरणा देण्यासाठी टॅक्सची नवी योजना आणली आहे. आता मार्च 2022 पर्यंत सुरु होणाऱ्या नविन उद्योगांसाठी टॅक्स हॉलिडे ही नवी योजना सरकारने आणली आहे. या योजनेनुसार नवीन उद्योजकांना टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय नवीन उद्योगामध्ये गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी टॅक्स फ्री भांडवली नफ्यावरही मुदतवाढ देण्यात आली आहे.

जेष्ठ नागरिकांना आयटीआरमधून दिलासा

या अर्थसंकल्पात जेष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आता 75 वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना आयटीआर न भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र याचा लाभ तेच नागरिक घेऊ शकतात, ज्यांची कमाई पेन्शन आणि व्याजावर आहे. जेष्ठ नागरिकांना इनकम टॅक्स भरणे अनिवार्य असून बँकेकडून टॅक्स कापूनच तु्म्हाला पैसे मिळतील. मात्र तुम्हाला आयटीआर भरण्याची आवश्यकता नाही.