पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूटला देणार भेट

0
221

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी २८ नोव्हेंबरला पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया संस्थेला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यात ‘कोविशिल्ड’ लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून विकसित केलेल्या या लशीची निर्मिती पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूट करत आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर चार डिसेंबरला 100 देशांचे राजदूत देखील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन तिथं सुरू असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत.

तसेच, लस उत्पादन आणि वितरणासाठी सिरम इन्स्टीट्यूटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. पंतप्रधान मोदी येत्या २८ नोव्हेंबरला SII ला भेट देणार असल्याच्या वृत्ताला पुण्याचे विभागीय आयुक्त सौरव राव यांनी दुजोरा दिला आहे.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या या लसीकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्त कार्यालयात त्यासाठी एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या दौऱ्यात इतर काही देशांचे राजदूतही सहभागी होण्याची शक्यता होती. मात्र हे 100 देशांचे राजदूत 4 डिसेंबर रोजी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.

लसीच्या मुद्द्यावरुन राजकारण करू नका – पंतप्रधान
कोरोना प्रतिबंधक लस कधी येईल हे आपल्या हातात नाही. लस कधी येणार हे संशोधकांच्या हाती आहे. त्यामुळं या मुद्द्यावरुन राजकारण करू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला होता. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, कोरोना लसीवर अनेक पातळीवर संशोधन सुरू आहे. काही लशी अंतिम टप्प्यात आहे. मात्र लस कधी येणार हे सांगता येत नाही. लस येईल तेव्हा येईल. पण कोरोनाबाबत सतर्क राहा, असेही त्यांनी सांगितले.

लशीचे आतापर्यंत चार कोटी डोस तयार
अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने करोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारसोबत करार केला असून आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे.

“भारतात लस उपलब्ध होण्यासाठी अजून दोन ते तीन महिने लागतील. जानेवारीपर्यंत आपल्याकडे किमान १० कोटी डोस तयार असतील. सरकारने जुलैपर्यंत ३० कोटी डोसचं लक्ष्य ठेवलं आहे. आम्ही किंमत ठरवत असून १००० रुपयांपर्यंत उपलब्ध असेल. खासगी मार्केटसाठी ५०० ते ६०० रुपये असणार आहे. तर सरकारसाठी २५० किंवा त्यापेक्षा कमी असेल,” अशी माहिती काही दिवसांपूर्वी अदर पूनावाला यांनी दिली होती,