PM Modi Meets State CMs: आता आपल्याला अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता –पंतप्रधान मोदी

0
203

देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळेत रोखणे गरजेचं आहे. कोरोना संबंधीच्या नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. गेल्या वर्षभरातील कोरोनाविरोधातील लढाईचं यश बेजबाबदारीत बदललं गेलं नाही पाहिजे. टेस्टिंग आणि ट्रेसिंग वेळेत होणे गरजेचं आहे. अनेक राज्यांमध्ये रॅपिड टेस्टवर जोर दिला जात आहे. मात्र आरटीपीसीआर टेस्ट 80 टक्क्यांच्यावर ठेवायला हव्यात, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

तसेच, “जिथं आवश्यक आहे आणि हे मी आग्रहाने सांगतो की मायक्रो कंटेंनमेंट झोन बनवण्याच्या पर्यायत कोणत्याही परिस्थितीत हयगय होता कामा नये. यावर काम झालं पाहिजे. याशिवाय करोना लस वाया जाण्याचे प्रकार थांबवावे.” असं देखील यावेळी मोदींनी सांगितलं. संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना कमीत कमी वेळात शोधून काढणं आणि आरटीपीसीआर टेस्ट ७० टक्क्यांपेक्षा अधिक ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे.” असंही मोदी म्हणाले.

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत या राज्यांमधून 79.73 टक्के नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. काही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील 70 जिल्ह्यांत ही वाढ 150 टक्क्यांपर्यंत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला वेळीच रोखलं पाहिजे असंही मोदी म्हणाले.