पंतप्रधान मोदी यांना अमेरिकेचा मोठा सन्मान; ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्काराने गौरव

0
218

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचा समजला जाणार लीजन ऑफ मेरिट या पुरस्काराने सन्मानितक करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने हा पुरस्कार भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी स्वीकारला. या पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: पंतप्रधान मोदी यांचे सुचवले असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधी रशिया, सौदी अरेबिया, बहरीन, संयुक्त अरब अमिरात, मालदीव आदी देशांनीदेखील सन्मानित केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी व्हाईट हाऊसमध्ये भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्याकडे हे पदक सोपवले. राष्ट्रपती ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना Legion of Merit हे पदक बहाल केलं आहे, असं ब्रायन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. Legion of Merit हा पुरस्कार अमेरिकेतील सर्वोच्च पुरस्कार आहे. चीफ कमांडर श्रेणीचा हा पुरस्कार असून तो केवळ एखाद्या देशाच्या सरकारला किंवा एखाद्या देशाच्या प्रमुखांनाच दिला जातो.

जागतिक महाशक्तीच्या दिशेने भारताची वाटचाल

भारताला जागतिक महाशक्ती म्हणून नावारुपाला आणण्यासाठी मोदींना हा पुरस्कार दिला आहे. शिवाय त्यांच्या मजबूत नेतृत्व क्षमतेसाठीही या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिका आणि भारताचे संबंध मजबूत करण्यावर भर दिला होता. त्याची दखलही हा पुरस्कार देताना घेण्यात आली आहे.

अमेरिकेतील प्रतिष्ठीत पुरस्कार

लीजन ऑफ मेरिट पुरस्कार अमेरिकेतील प्रतिष्ठीत पुरस्कार समजला जातो. अतुलनीय आणि असामान्य कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार इतर देशांच्या प्रमुखांसह अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना प्रदान केला जातो. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत झाले. या आधारेच ट्रम्प यांनी मोदींना हा पुरस्कार प्रदान केला.

अमेरिेकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी हा सन्मान भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांनी याचा फोटो ट्विट करत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लीजन ऑफ मेरिट या पुरस्काराने सन्मानित केले आहे. जागतिक पातळीवर भारताला त्यांनी पोहचवले असून भारत-अमेरिका संबंधांना अधिक घट्ट केले आहे. त्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे ओब्रायन यांनी म्हटले.