नक्की काय आहे डिजिलॉकर? डिजीलॉकरचा वापर कसा करायचा?

0
844

सध्या डिजिटल युगाचा काळ आहे. भारत सरकारने डिजिटल इंडिया ही संकल्पना सुरु करून भारताला काही प्रगत देशांच्या रांगेत नेऊन ठेवले आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत येणारा अत्यंत महत्वाचा प्रकार म्हणजे ‘डिजिटल लॉकर’ याला ‘डिजिलॉकर’ असेही म्हणतात. आज आपण डिजिलॉकर म्हणजे नक्की आहे तरी काय? याबद्दल आपण माहिती देणार आहोत.

आपल्याला अनेकदा शासकीय कामांसाठी महत्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. काही वेळा आवश्यक ती कागदपत्रे आपल्याजवळ उपलब्ध नसल्याने आपल्या कामाला विलंब होण्याची शक्यता असते. विशेषत: बॅंकेत खाते उघडताना, गॅसचे कनेक्शन घेताना अशा अडचणी जाणवण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत कागदत्रांअभावी काम थांबू नये म्हणून केंद्र सरकारने डिजी लॉकरची सुविधा दिली आहे.

नक्की काय आहे डिजिलॉकर?

डिजिटल लॉकर म्हणजेच ‘पेपरलेस डिजिटल प्रणाली’. थोडक्यात डिजिलॉकर म्हणजे जिथे महत्वाचे दस्तऐवज, कागदपत्रे ठेवायची मोफत सोय आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, शैक्षणिक कागदपत्रे किंवा अन्य महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित सांभाळता यावे यासाठी केंद्र सरकारने दिलेली सुविधा म्हणजे डिजी लॉकर. डिजी लॉकरमध्ये साठविलेली कागदपत्रे हवी तेव्हा हवे तेथे डाऊनलोड करता येतात आणि त्यांची प्रिंटही काढता येते. गरज असेल तेथे डिजीटल स्वाक्षरी केलेली कागदपत्रे साठविण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

हे एक पोर्टल असून तेथे विविध प्रकारचे दस्त सुरक्षित राहतील अशी जागा असून त्यासाठी क्लाउड तंत्रज्ञानाचा वापर केलला आहे. आपली ओळख पटवून काही सूचनांचे टवून काही सूचनांचे पालन केल्यास आपल्याला अनेक गोष्टी विविध ठिकाणांहून घेऊन या ठिकाणी सुरक्षित ठेवता येतात…

डिजीलॉकरचा वापर कसा करायचा आपण त्याबद्दल माहिती घेऊया

सर्वप्रथम तुम्हाला डिजिलॉकर वापरण्यासाठी https://digilocker.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. (b) यासाठी आधार क्रमांक हा अनिवार्य आहे किंवा आधारला जोडलेला चालू मोबाइल नंबरही असावाच!

डिजीलॉकर हे गुगल प्लेस्टोअरवर जाऊन अॅप डाऊनलोड करू शकता. हे अॅप इन्स्टॉल केल्यावर तुमच्या आधार नंबरने साईन इन करावे लागले. यासाठी आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. या नंबरवर आलेला ओटीपी अॅपमध्ये टाकावा लागणार आहे. यानंतर ईमेल आयडी देऊन पासवर्ड बनवावा लागणार आहे.

तत्पूर्वी तुम्हाला तुमची सर्व महत्वाची कागदपत्रे अगोदर स्कॅन करून घेणे आवश्यक आहे. तुम्ही स्कॅन केलेली महत्वाची कागदपत्रे, वोटर आयडी, पॅन आयडी, मार्क शीट्स, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, डोमासाइल सर्टिफिकेट, इनकमटॅक्स रिटर्न्स इ. सह अनेक सर्व प्रकारची महत्वाची कागदपत्रे डिजिलॉकरवर स्टोअर करू शकता.

तर आपण आता डिजिलॉकर कसे वापराल त्याबद्दल जाणून घेतले नाही का. पण त्यामध्ये किती माहिती साठवता येते?

डिजी लॉकरमध्ये प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रपणे १ गीगाबाईट एवढी माहिती साठविण्याची सुविधा देण्यात आली आहे. डिजी लॉकरमध्ये साठविलेल्या कागदपत्रांची लिंक हव्या त्या ई-मेलवर सहजपणे पाठविण्याची सुविधाही आहे. शिवाय काही शासकीय कार्यालयांमध्ये कागदपत्रांच्या छापील प्रतीऐवजी डिजी लॉकरमधील कागदपत्राची डिजीटल प्रत स्विकारण्याची सुविधाही आहे.

आपण डिजिलॉकरमध्ये समाविष्ट करता येण्याजोगी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती असू शकतात ते पाहूया

सर्व प्रकारच्या विमा पॉलिसीचे करार, बँकांचे फिक्स डिपॉजिट व पोस्टाच्या योजनांची प्रमाणपत्रे, डिपॉजिटरी स्टेटमेंट व म्युच्युअल फंड स्टेटमेंट, आयकर विवरणपत्र भरल्याची पोहोच, मालमत्ता कराची मागणी व भरल्याचे बिल व वीज बिल, निवडणूक ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, मालमत्ता प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, पासपोर्ट यांसारखी कागदपत्रे डिजिलॉकरमध्ये समाविष्ट करू शकतात.