ई-नाम’ (e-NAM) म्हणजे काय?

0
548

इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM )’ पोर्टलचे उद्घाटन 14 एप्रिल 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. ‘एक राष्ट्र एक बाजार’ (One Nation One Market) असा कृषीमालाच्या विक्रीसाठी संपूर्ण देशभरात एकच सामायिक मंच असावा, या उद्देशाने याची स्थापना झाली होती. e-NAM ही सेवा कार्यन्वित झाल्यावर देशभरातील शेतकरी, शेतकरी संघटना आणि (Farm Producer Company ) शेती उत्पादक कंपन्या ह्या जुडल्या जाणार आहेत. याच अॅपवर राष्ट्रीय कृषी बाजाराशी शेतकरी जुडले जाणार असून एकाच ठिकाणी सर्व सुविधांचा लाभ घेता येईल. वाहतूक, रसद, हवामान अंदाज आणि फिन्टेक सेवा अशा खासगी संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. हे पूर्ण झाल्यानंतर e-NAM-नामशी संलग्न शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळू शकणार आहेत. या माध्यमातून 1 कोटी 75 लाख शेतकरी जुडले जाणार आहेत.

‘ई-नाम ( e-NAM)’ हे ऑनलाईन पोर्टल देशभरातील शेतकरी, व्यापारी, खरेदीदार यांना एकत्र आणणारे आणि सर्वोत्तम भाव, योग्य बाजारपेठ मिळवून देणारे पोर्टल आहे. पोर्टलचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे, आपल्या स्थानिक शेतमालाला देशभरात पोहचवणे हा आहे. सुरुवातीच्या या दोन टप्प्यांत साधारण २२ कोटी शेतकरी या पोर्टलच्या मदतीने आपला शेतमाल देशाच्या निरनिराळ्या बाजारांमध्ये विकत आहेत. हा सर्व व्यवहार उत्पादक शेतकरी आणि थेट ग्राहकांमध्ये होत असल्यामुळे यात कोणत्या मध्यस्थांची गरज नसते. त्यामुळे कमी खर्चात आपला माल ग्राहकांकडे पोहचत असल्याने शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असतो.

‘ई-नाम शी शेतकरी कसे जोडले जातील ?
enam.gov.in. या संकेतस्थळावर जाऊन तेथील सर्चबारमध्ये ‘नोंदणी’ (Registration) या पर्यायाला क्लिक करा. त्यानंतर ‘शेतकरी (Farmer)’ हे पर्याय निवडल्यावर लॉन इन करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या इ-मेलवर तुम्हाला तात्पुरते लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल. याच्या आधारे तुम्ही लॉगिन करु शकता. लॉगिन केल्यानंतर सुरु होणाऱ्या डॅशबोर्डमध्ये तुम्ही आपल्या कागदपत्रांची नोंदणी करु शकता. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून यास मान्यता मिळाली की, तुम्ही व्यवहार करण्यास सुरुवात करु शकता.

शेतकरी उत्पादक कंपनीच प्रभावी माध्यम
सध्या सुमारे 530 बाजार समित्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने व्यापार सुरु आहे. तर संबंधित राज्यासाठी वैध असलेले सुमारे 97 हजार परवाने ई-नाम प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत 2 लाख व्यापाऱ्यांना देण्यात आले आहेत. या अॅपवर अन्नधान्य, तेलबिया, मसाले, फळे आणि भाज्यांचा व्यापार केला जातो. एसएफएसीचे एमडी दरबारी यांनी सांगितले की, या व्यासपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देशभरातील त्यांच्या उत्पादनाच्या किंमती याची माहिती मिळणार आहे. यामुळे शेतीमालाची विक्री केव्हा करायची याची माहिती मिळते. देशात बहुतेक लहान शेतकरी आहेत. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकरी हे जोडले जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यावरच सरकारचा भर राहणार आहे