झेड प्लस सुरक्षा’ कोणास मिळते? एक्स, वाय, झेड आणि एसपीजी सुरक्षा काय आहे?

0
519

एमआयएम’’चे प्रमुख असादुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर गोळय़ा झाडण्याच्या घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून त्यांनी झेड श्रेणीची सुरक्षा स्वीकारावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ओवेसी यांनी मात्र ही सुरक्षा नाकारली असल्याची माहिती शहा यांनी सोमवारी लोकसभा व राज्यसभेत दिली. आपण मध्येही ऐकलं असेल कंगना राणावत यांना झेड श्रेणी सुरक्षा देण्यात आली म्हणून. पण त्या सुरक्षा श्रेणी नेमकी काय आहेत आणि त्या कोणकोणत्या लोकांना मिळतात आपण त्याची माहिती घेऊया

कोणाला सुरक्षा पुरवली जाते?

प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक आणि क्रीडापटू यांना सरकारकडून सुरक्षा दिली जाते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची, याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो. एक्स, वाय, झेड आणि एसपीजी कमांडो असे सुरक्षेचे विविध प्रकार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना आधी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे सुरक्षा कवच होते. पण आता त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. परिस्थितीनुसार, सुरक्षेचा आढावा घेऊन सरकारकडून व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेच्या दर्जामध्ये बदल केला जातो. मध्यंतरी शिवसेनेबरोबर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रणौतला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.

सरकार मोठे अधिकारी ,नेते, आणि समाजामध्ये लोकप्रिय असणाऱ्या व्यक्तींना सिक्युरिटी देते. या सिक्युरिटी मध्ये वेगवेगळ्या श्रेणीमध्ये सुरक्षा प्रदान केली जाते. ही सिक्युरिटी कोणाला द्यायची याचा निर्णय हा केंद्र सरकार घेत असते. झेड प्लस पासून एक्स श्रेणी पर्यंत सुरक्षा प्रदान केले जाते.

झेड प्लस दर्जाची सुरक्षा ही देशातील सर्वात खतरनाक सुरक्षा म्हणून ओळखली जाते. ही सुरक्षा VVIP दर्जाची सुरक्षा आहे. यामध्ये 36 सुरक्षारक्षक असतात. यामध्ये एस पी जी आणि एनएसजी चे कमांडोज असतात. यामध्ये पुढे एनएसजी कमांडो असतात तर मागे एस पी जी कमांडो असतात. यांच्याव्यतिरिक्त आयटीबीपी आणि सीआरपीएफचे जवान देखील या श्रेणीमध्ये असतात.

झेड श्रेणी हा संरक्षणाचा दुसरा स्तर आहे.यात 22 सैनिकांची सुरक्षा कवच आहे. यामध्ये चार किंवा पाच एनएसजी कमांडो आणि एका पोलिस अधिकाऱ्याचा देखील समावेश असतो.

वाय श्रेणी ही सुरक्षेचा तिसरा स्तर आहे. यात 11 सैनिकांची सुरक्षा कवच आहे. एक किंवा दोन कमांडो आणि एक पोलिस अधिकारीही यात सामील असतो.

एक्स श्रेणी संरक्षणातील चौथे स्तर आहे.यात 5 किंवा 2 सैनिकांची सुरक्षा कवच आहे. तसेच एक सशस्त्र पोलिस अधिकाऱ्याचा देखील समावेश असतो.

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) –
एसपीजी सुरक्षेबाबत बरीच गोपनीयता बाळगली जाते. विद्यमान आणि माजी पंतप्रधान तसेच त्यांच्या कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा प्रदान केली जाते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८८ साली एसपीजीची स्थापना करण्यात आली. सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एसपीजीची सुरक्षा आहे.

सुरक्षा कशी मिळवायची?

धोक्याचे कारण सांगून घराजवळील पोलिस स्टेशनला अर्ज करणे आवश्यक आहे. राज्य सरकार हे प्रकरण गुप्तचर यंत्रणेकडे सोपवते. धोक्याच्या बाबतीत, मुख्य सचिव सचिवांच्या समितीने कोणती श्रेणी सुरक्षा द्यायची हे राज्य गृहसचिव, महासंचालक निर्णय घेतात. त्या व्यक्तीचा तपशील केंद्रीय गृह मंत्रालयाला द्यावा लागतो. गृहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती सुरक्षा प्रकाराचा निर्णय घेते.