पुस्तक प्रकाशन सोहळा; दीपक भन्साली याचे “अ फोर लेटर वर्ड” पुस्तक प्रकाशित

0
535
  • “A FOUR LETTER WORD – An Inspirational Romance”

आपल्या आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येकाला काही ना काही छंद, आवड असतेच पण प्रत्येक जण पैसा आणि बिझनेसच्या मागे धावत असल्यामुळे आपली आवड कुठेतरी हरवत असल्याचे पाहायला मिळतेय.पण ह्या महामारीच्या काळात आपण जशी अनेक अवघड आव्हाने पेलली तसच हि महामारी आपल्यासाठी आपला छंद पुन्हा एकदा नव्याने शोधण्याची संधी घेऊन आली.

पेश्याने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या दीपक भन्साली या व्यक्तीने ह्या संधीचे सोने केले. जिथे सर्व व्यापार ठप्प झाले आहेत त्या काळात इनकम टॅक्स रिटर्न भरणे हि लोकांची प्राथमिकता राहिलेली नाहीये. हि सगळी परिस्थिती त्याच्या प्रोफेशन ला इजा पोहचवणारी च ठरली पण एक पाऊल मागे जरी घ्यावे लागले असले तरी हि एक चालून आलेली संधी आहे हे ओळखून आपल्यातील हरवलेले कौशल्य आपली राहिलेली इच्छा त्यांनी पूर्ण केली ते लेखक होण्याची आणि त्यांच्या लेखणीतून जे लिहले गेले ते अतिशय सुंदर अस – A FOUR LETTER WORD – An Inspirational Romance.

जीवन कसे जगले पाहिजे ह्याची शिकवण जेथून मिळाली त्याच हिरवाईने नटलेल्या परिसरात म्हणजेच श्री महावीर जैन विद्यालय येथे दीपक भन्साली याने त्याच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये कोरोना महामारीमुळे मर्यादित लोकांना आमंत्रण दिले होते आणि सोशल डिस्टंसिन्ग चे सर्व नियम पाळण्यात आले. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह व इंस्टाग्राम लाईव्ह वरूनही दाखवण्यात आले. पुस्तकाचे प्रकाशन सुधा मेनन (प्रसिद्ध लेखक), प्रशांत तळणीकर (प्रसिद्ध लेखक), युवराज शाह (सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक), दीपक भन्साळी (लेखक), पुनमचंद भन्साळी आणि कल्पना भन्साळी यांच्या हस्ते करण्यात आले. आजकालच्या डिजिटल जगाला आहारी गेलेल्या हट्टी तरुण पिढीसाठी हे पुस्तक कसे मार्गदर्शक ठरेल ह्यावर प्रमुख मान्यवरांनी प्रकाश टाकले.

प्रत्येक प्रेमाचा शेवट फिल्मीच असावा असा आपला आग्रह असतो , सध्याच्या आभासात्मक जगात लायकीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्यामूळे जेव्हा भ्रमनिरास होतो , तेव्हा येणारे नैराश्य माणसाला वैफल्याकडे नेते , त्यामूळे जे हाती आहे त्यात समाधान शोधता आले पाहीजे असे विचार पत्रकार व लेखिका सूधा मेनन यांनी येथील महावीर जैन विद्यालयात दिपक भन्साळी लिखीत “ फोर लेटर वर्ल्ड : ऐन इन्स्पीरेशनल रोमान्स“ या पूस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले.

युवराज शहा यांनी सध्याच्या व्हाटसअप आणि फेसबुक च्या आजच्या उथळ वैचारीक वातावरणात “प्रेमाकडे सकारात्मक व अभ्यासू निरीक्षणातून पाहून अशा प्रकारे पुस्तक रुपाने हल्लीच्या मोबाईल बाधीत जगात आणणे हेच मूळात धाडस असल्याचे सांगितले , युवापिढीने आपली सर्जनशीलता अशीच शब्दबद्ध केल्यास आगामी काळात चांगले वैविध्यपूर्ण वाचनीय लेखन निर्माण होऊ शकेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

अ फोर लेटर वर्ड ( A FOUR LETTER WORD ) ह्या पुस्तकातून दैनंदिन जीवनावर आधारीत अशी प्रेरणादायी कथा आपल्याला वाचायला मिळेल. हे पुस्तक इतर पुस्तकांपेक्षा वेगळे असून उत्स्फूर्त प्रेमकथा न सांगता आपल्या आत दडलेल्या भावनांचे दर्शन घडवू आणते. ह्या पुस्तकाच्या वाचनानंतर वाचकांच्या मनात नक्कीच नवीन ऊर्जा तयार होईल त्यांचे जीवन नक्कीच प्रेरणादायी वाटेकडे वाटचाल करेल.

सदर पुस्तक अमेझॉन आणि फ्लिपकार्ट तसेच पुणे शहरातील विविध पुस्तकालयात उपलब्ध आहेत.

A Four Letter Word: In quest of love, he discovers life

https://www.amazon.in/dp/B08KHH2C4W/ref=cm_sw_r_em_apa_i_fXbMFb7RREYSE