April Fool Day: एप्रिल फूल म्हणजे काय? कशी झाली सुरूवात आणि इतिहास काय आहे?

0
516

एक एप्रिल तारीख आली रे आली की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो तो आज कोणाला मूर्ख बनवायचे किंवा कोणाची चेष्टा करायची. एप्रिल फूल (April Fool) फक्त भारतातच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. काही देशांमध्ये या दिवशी सुट्टीही असते. या दिवशी लोक एकमेकांची चेष्टा करतात. एप्रिल फूल निमित्त लोक एकमेकांना खोडकर संदेशही पाठवतात. प्रत्येकजण या दिवशी कोणत्याना कोणत्या मार्गाने समोरच्या व्यक्तीला एप्रिल फूल बनवत असतो.

नेमका एप्रिल फूल साजरा करण्यामागचा उद्देश किंवा संपल्पना आजही स्पष्ट झालेली नाही. पण लहानांपासून वृद्धांपर्यंत या दिवसाचा आनंद घेतात. एप्रिल फूल या दिवसाचा संबंध वसंत ऋतुशी जोडला जातो. कारण वसंत ऋतुच्या सुरुवातीचा हा पहिला दिवस असतो. या वसंत ऋतुच्या आगमानाने निसर्गात अनेक बदल होता. हे निसर्गाचे अदभुत बदल अनेकांनाच भुरळ पाडणारे असतात.

तसं पाहायला तर ती ही शेकडो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे १५ व्या शतकातली वगैरे. १५८२ मध्ये पोप तेरावे ग्रेगरी यांनी ज्युलिअन दिनदर्शिका बदलून ग्रेगरिअन दिनदर्शिका आणली. आता गोष्ट अशी होती की याआधी सगळेच जण १ एप्रिलला नववर्ष साजरे करायचे पण पोपच्या नव्या दिनदर्शिकेने सारा घोळच झाला म्हणायचा. या नव्या दिनदर्शिकेनुसार आता सगळ्यांनी १ एप्रिल ऐवजी १ जानेवारीला नववर्ष साजरं करावं असा आदेश काढण्यात आला. आता वर्षानुवर्ष एप्रिलमध्ये नववर्ष साजरे करण्याची परंपरा आपली. तिथे रातोरात फर्मान काढून जर कोणी आपले सणच बदलले तर काय होणार हे वेगळं सांगायला नको. साहजिकच अनेकांना ते काही रुचलं नाही. त्यामुळे लोकांनी याला कडाडून विरोध केलाच, आंदोलन वगैरे झाली ती वेगळीच. पण हळूहळू लोकांना मात्र तो निर्णय मान्य करावाच लागला, पण काही असेही लोक होते ज्यांनी मात्र १ जानेवारीला नववर्ष साजरं करण्यास ठाम नकार दिलाचय आम्ही १ एप्रिललाच नववर्ष साजरं करू या निर्णयावर ते ठाम राहिले. त्यामुळे या सगळ्यांनाचा मुर्ख ठरवण्यात आले. तेव्हापासून १ एप्रिल हा दिवस मुर्खाचा दिवस म्हणजे ‘एप्रिल फुल’ डे साजरा करण्यात येऊ लागला. फ्रान्समधली ही गोष्ट युरोपभर पसरली आणि त्यानंतर ‘एप्रिल फुल’ साजरा करण्यात येऊ लागला अशीही ही गोष्ट सांगितली जाते.

एप्रिल फुलबद्दल आणखी एक गोष्ट फारच मजेशीर आहे. कॉन्सन्टाइन द ग्रेट याच्या काळात काही विदूषक राजदरबारात गेले. आपण या राजपेक्षाही चांगला कारभार करू शकतो असे त्यांचे मत पडले. आता उदार राजांनी एक दिवसासाठी गंमत म्हणून त्यातल्या एका विदूषकाच्या हाती राज्यकारभार सोपवला, तर एका विदूषकाने फर्मानच काढले. वर्षातला एक दिवस सगळ्या जनतेने मुर्खासारखे वागायचे आणि विदूषकासारखे चाळे करायचे. विदूषकाचा हेतू एवढाच की इतरांना हसवणं किती कठीण असतं हे लोकांना दाखवून द्यावं आणि तेव्हा पासून ‘फुल डे’ साजरा करण्याची जणू परंपराच सुरु झाली. तशा एप्रिल फुल डेच्या अनेक गोष्टी आहेत पण यातल्या या दोन तर खूपच गंमतीशीर आहेत नाही का!

दरम्यान, एप्रिल फूल दिन वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये एप्रिल फूल दिन फक्त दुपारपर्यंत साजरा केला जातो. तर जपान, रशिया, आयर्लंड, इटली आणि ब्राझीलमध्ये संपूर्ण दिवस एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो