हिवाळा आणि कूल फॅशनेबल कपडे

0
989

आपल्या भारत देशामध्ये ऋतूंचे चक्र हे फिरतच असते. जसे की उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा.हे तिन्ही ऋतू म्हणजेच निसर्गाची अजब जादूच म्हणावी लागेल. या भारत देशात येणारे सर्व ऋतू महत्वाचे आहेत. परंतु त्यापैकी हिवाळा हा ऋतू भारतातील सर्वात मोठा आणि थंड हवामानाचा ऋतू आहे. या ऋतूमुळे संपूर्ण वातावरणामध्ये थंडपणा पसरतो. हिवाळ्याच्या महिन्यात पर्वतीय प्रदेश हा बर्फाच्छादित असतो आणि कधी –कधी तापमान हे खूप कमी असते.

हिवाळा (Winter) म्हटला की वर्षभर जी गोष्ट कपाटाच्या ठेवली असते ती बाहेर निघते ते म्हणजे स्वेटर (Sweater) आणि मफलर (Muffler). लोकरीचे मऊ आणि उबदार स्वेटर थंडीत खूपच कामी येते. हिवाळ्यात थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण लोकरीच्या अथवा उबदार कपड्यांचा वापर करतो. उब देणारे कपडे घातले की थंड हवा आणि गारव्याचा त्रास होत नाही. थंडीच्या दिवसांमध्ये यासाठीच निरनिराळ्या प्रकारचे स्वेटर, लेदर जॅकेट, हुडी, शॉल, मफ्लर, स्टोल, थर्मल्स, श्रग, कानटोपी, हातमोजे, पायमोजे बाजारात उपलब्ध असतात. हिवाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी हे कपडे मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतो.

जॅकेट्स- जॅकेट आणि कोटशिवाय हिवाळा जाणं शक्य नाही. तुमचा पोशाख आणि कार्यक्रमावर आधारित योग्य जॅकेट ठरवणं थोडसं कठीण असू शकतं. रात्रीच्यावेळी बाहेर जाताना आपल्या शरीराच्या आकारानुसार आऊटफिट्सवर जॅकेट वापरा. दिवसा बाहेर जाताना कोटला प्राधान्य द्या.

हिवाळ्यात थर्माकोट परिधान करणे फायदेशीर असते. कारण त्याने तुम्हाला थंडीची तीव्रता कमी जाणवेलच परंतु, आपले स्टाइल स्टेटमेंटही कायम राखता येईल. हिवाळ्यातील उबदार कपडे देखील तुम्ही फॅशनेबल बनवू शकतात. हायनेक स्वेटर व कोट यांच्यासोबत रंग-बिरंगी मफलर, मोत्यांची लांब माळ, ब्रेसलेट आदी ‘ट्राय’ करून ‘डिफरंट लूक’ देऊ शकतात.

स्वेटर व्यतिरिक्त स्वेट शर्ट मध्ये आतून किंवा वरून अजून कोणतेही कपडे घालायची गरज भासत नाही. थंडीच्या रक्षणासोबतच हा शर्ट फॅशनेबल लूक पण देतो. पोलो नेक , व्ही शेप, शॉल कॉलर, क्रू नेक्लाइन अशा स्वेट शर्टच्या नेकलाईन मध्ये अनेक प्रकारची व्हरायटी तुम्हाला उपयोगी येईल.