महाराष्ट्र अनलॉक-1: राज्यात आजपासून ह्या गोष्टी सुरु होणार

0
333

(शाळा, कॉलेज, मेट्रो, हॉटेल्स, सलून बंदच; धार्मिक स्थळे उघडण्यास सरकारची संमती नाही)

मिशन बिगीन अगेन’ या ठाकरे सरकारच्या अभियानाचा तिसरा टप्पा सोमवारपासून (८ जून) प्रारंभ हाेत आहे. लाॅकडाऊनमुळे ७३ दिवस ठप्प झालेले राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येणार आहे. २४ मार्चपासून राज्यात लाॅकडाऊन, तर ३ जूनपासून अनलाॅक सुरू झाले. मिशेन बिगेन अंतर्गत राज्यात आजपासून खाजगी कार्यालये १० टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू होत आहेत. तर शासकीय कार्यालयातील उपस्थितीही आजपासून वाढणार आहे. दुसरीकडे विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळा शिक्षणासाठी बंदच राहणार आहेत. मात्र उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी आणि ऑनलाईन शिक्षणासाठी शाळा आजपासून सुरू होणार आहेत.

  1. खासगी कार्यालये :

१०% कर्मचाऱ्यांसह खासगी कार्यालये स. ९ ते ५ उघडतील. एमएमआरए क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती व नागपूर मनपा हद्दीत सरकारी कार्यालये १५% मनुष्यबळांमध्ये उघडतील.

  1. बस आणि एसटी सेवा

आजपासून जिल्ह्यांतर्गत बस आणि एसटी सेवेचा प्रारंभ होत आहे. बस क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. कंटेनमेंट झोन वगळता टप्पा १ व २ मध्ये सवलती दिल्या होत्या. त्या तिसऱ्या टप्प्यात कायम राहतील.

३. खेळाची मैदाने

खेळाची मैदाने खेळाडूंना सरावासाठी आणि खेळासाठी खुली होतील. मात्र, प्रेक्षकांना मैदानात परवानगी नसेल.

४. वाहतूक व्यवस्था

सामान्य प्रवाशांसाठी बाईक – १ प्रवासी.
सामान्य प्रवाशांसाठी रिक्षा – १ + २ प्रवासी.
सामान्य प्रवाशांसाठी कार – १ + २ प्रवासी.

५. सर्व प्रकारची दुकाने

सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनच्या नियमांचे पालन करत सर्व दुकाने खुली ठेवण्याची परवानगी असेल. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहतील.

या ठिकाणी बंदी कायम :

  • विद्यार्थ्यांसाठी शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस बंद राहणार
  • आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार
  • मेट्रो, लोकलसेवा बंद राहणार
  • स्विमिंग पूल, जिम, सिनेमागृह, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार