राज्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय

0
194

करोनाच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ठराविक कालावधीनंतर लॉकडाऊनला मुदतवाढ दिली जात असून, राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवला आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. सध्या राज्य सरकारने बंद असलेल्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. अनेक महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबई लोकल सेवा एक फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार असून ठराविक वेळेसाठी परवानगी मिळाली आहे. राज्यातील लॉकडाऊन 31जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यात पुन्हा कालावधी वाढविण्यात आला आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत निर्बंध कायम ठेवले जाणार आहे. राज्य सरकारने याविषयी परिपत्रक जारी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमधून सतत मुदतवाढ दिली जात आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, तसे आदेश आज काढण्यात आले आहेत. आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टींवर सुरू राहणार आहेत. तर ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या यानंतरही बंदच राहणार आहे.

नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खालील सूचनांचं पालन करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
सामाजिक अंतर राखणं गरजेचं
सतत हात धुणे आवश्यक