हॉटेल, रेस्टॉरंटला जाताना योग्य प्रकारे घ्या काळजी

0
287

तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळाच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटचे दरवाजे खुले झाले. ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली असली, तरी पहिल्या दिवशी या क्षमतेचा वापर झाला नाही. राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार सुरु झाले आहेत. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार बंद होते. मात्र अनलॉक 5 मध्ये राज्य सरकारने नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली.

50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारने ही बंधने शिथिल केल्यानंतर महापालिकेने सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत ५० टक्के क्षमतेने हॉटेल खुली करण्यास मान्यता दिली. गेल्या दोन दिवसांमध्ये हॉटेल उघडण्यासाठी पूर्वतयारी केल्यानंतर सोमवारी सकाळी शहराच्या वेगवेगळ्या भागांतील हॉटेल ग्राहकांसाठी उघडली. बहुतांश हॉटेलचालकांनी ठरावीक टेबल ग्राहकांसाठी खुली करताना इतर टेबलांवर फुल्या मारून ठेवल्या होत्या.

हे नियम लक्षात ठेवा :-

– प्रत्येक ग्राहकाची प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग होणार. कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे आहे का? हे तपासावे. उदा. तापमान, सर्दी, खोकला.
– लक्षणविरहीत ग्राहकांनाचं केवळ प्रवेश द्यावा.
– हॉटेल, रेस्टारंटमध्ये भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांची नोंदणी ठेवावी.
– कोणालाही सेवा देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.
– ग्राहकांच्या परवानगीने त्यांची माहिती प्रशासनास पुरवावी. जेणेकरुन कोणत्याही रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा तपास करणे सोपे होईल.
– कोणत्याही ग्राहकाला मास्कशिवाय प्रवेश देऊ नये. केवळ खाण्यासाठी मास्क काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.
– प्रत्येक ग्राहकासाठी हँडसॅनिटायझर्सची सोय करण्यात यावी.
– शक्यतो पैसे हे डिजीटल पद्धतीने स्वीकारावे.
– वॉशरुम्स आणि हात धुण्याचा परीसर कायम तपासत राहवे. तिथे सातत्याने स्वच्छता ठेवावी.
– ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील संपर्क कमीत कमी ठेवावा.
– सर्व सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित असावे.
– हॉटेल- रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर हॉटेल्समध्ये टेबलचं प्री- बुकिंग करणं आवश्यक असेल.
– एका ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एका वेळी हॉटेलमध्ये प्रवास करु शकणार नाही.
– दोन टेबलमध्ये सुरक्षित फुटांचे अंतर असणे गरजेचे.
– वेळोवेळी टेबल आणि हॉटेलच्या किचनची स्वच्छता होणे आवश्यक असेल.
– हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविडची चाचणी करणे आवश्यक असेल.