Sahitya akadami award 2020 : साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, 2 मराठी लेखकांचा होणार सन्मान

0
357

देशभरात प्रतिष्ठेचे मानले जाणारे साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर (Sahitya Akademi Award) झाले आहेत. यंदा दोन मराठी लेखकांना हे पुरस्कार पटकावण्यात यश आलं आहे. मराठीमध्ये नंदा खरे -कादंबरी उद्या आणि आबा महाजन- आबाची गोष्ट (बालसाहित्य) या दोन लेखकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

नागपूरचे नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला मराठीसाठी सन 2020 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

साहित्य अकादमीने आज (शुक्रवार) २० भाषांसाठी वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये सात कविता संग्रह, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटकं, एक-एक संस्मरण आणि महाकाव्यांचा समावेश आहे.

या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून यावर्षी विशेष समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर आणि डॉ. निशिकांत मिराजकर यांचा समावेश होता. मल्याळम, नेपाळी , उडिया आणि राजस्थानी भाषेसाठीचे पुरस्कार येत्या काळात घोषित करण्यात येणार आहेत.

नंदा खरे यांनी पुरस्कार नाकारला

उद्या कादंबरीचे लेखक नंदा खरे यांनी मात्र पुरस्कार नाकारला आहे. पुरस्कार मिळाल्याचा आपल्याला आनंद आहे. पण हा पुरस्कार मी नाकारतो, असं ते म्हणाले. समाजाने आपल्याला आजवर भरपूर दिलं, असं नंदा खरे म्हणाले.

आबाची गोष्ट’ बाल साहित्य पुरस्काराची मानकरी

साहित्य अकादमीच्या वर्ष २०२० च्या बाल साहित्य पुरस्कारासाठी २१ प्रादेशिक भाषांमधील साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्यामधून आबा महाजन लिखित ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहाची बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.