करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्या सकाळपासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन राहणार आहे. या काळात मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील सर्व नागरी भागांत १४४ लागू करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, “आज ९ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू आहे. अनेकांना तो नंतर संपेल असे वाटेल. पण हा संयम उद्या पहाटेपर्यंत असाच कायम ठेवायचा आहे. त्यासाठी रात्री ९ वाजल्यानतंर बाहेर पडू नका. मध्यरात्रीपासून कुणीही दुसऱ्या देशातून आपल्या देशात येणार नाही. परदेशी फ्लाइटला देशात उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे, विनाकरण गर्दी करू नका. टोळक्यांमध्ये फिरू नका. 31 मार्च पर्यंत राज्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. यापुढे गरज पडल्यास आणखी त्यामध्ये वाढ करण्यात येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. यात जीवनावश्यक सेवा आणि वस्तूंना सूट दिली जाणार आहे. खासगी बस, एसटी, लोकल पूर्णपणे बंद राहणार आहेत. परदेशातून येणाऱ्यांनी एकटं रहावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. गरज नसताना घराबाहेर पडू नका तसंच जी जी लोकं गेल्या १५ दिवसांमध्ये विदेशातून आली आहेत त्यांनी बाहेर फिरू नका, त्यांच्या संपर्कात तुम्ही आला असाल तर तुम्हीही बाहेर फिरू नका असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्रात कोरोनाव्हायरच्या रुग्णांची संख्या बेरजेप्रमाणे वाढत होती. आता ही संख्या गुणाकाराच्या दिशेने जात आहे. रुग्णांच्या संख्येत गुणाकार होणे हे अतिशय धोकादायक आहे. त्यामुळेच हा लॉकडाऊन लागू केला जात आहे. सर्वांनी सूचनांचे पालन केल्यास कोरोना व्हायरसचा आकडा मायनसमध्ये अर्थात वजा होण्यास मदत मिळेल असेही ते पुढे म्हणाले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पुढचे काही दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र फिरु नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केले.
कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता या काळात, नाईलाजाने अनेक उद्योग बंद करण्यात आले आहेत. पण, यासोबतच या उद्योग जगतात काम करणारे असंख्य कामगार हेच अर्थव्यवस्थेचा पाठकणा असल्याचं सांगत प्रशासनासोबतच संबंधित उद्योगाची मालकी असणाऱ्या मंडळींवरही या कामगार वर्गाची जबाबदारी असल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली. शिवाय या संकटसमयी कामगारांच्या किमात वेतनात कपात न करण्याची विनंती त्यांनी केली. माणुसकी सोडू नका असा संदेश देत त्यांनी पुढचे काही दिवस हे परीक्षेचे आहेत