भाजपने २०१९ साली पुन्हा तब्बल ३०३ जागांसह पुन्हा बहुमत प्राप्त केल्याचे पाहून काही मंडळी पुरती भांबावली. अर्थात, सर्वसामान्य मतदारांना नेहमीच मूर्ख समजण्याची चूक ही मंडळी करीत असल्याने त्यांचा अंदाज २०१४ नंतर २०१९ सालीही पुन्हा चुकला. आज मोदी सरकारला १ वर्ष पुर्ण होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील पहिले वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशाला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात पीएम मोदी यांनी आपल्या सरकारच्या वर्षभराच्या कामांचा उल्लेख केला आहे. या पत्रात ते म्हणाले की, गेल्या वर्षी याच दिवशी भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय सुरू झाला. २०१४ ते २०१९ या काळात भारताचा मान प्रचंड वाढला. मागील एक वर्षात काही निर्णयांवर व्यापक चर्चा झाली आणि ते निर्णय चर्चेत राहिले. पंतप्रधान म्हणाले की, आ्मही प्रवासी कामगार व कामगारांचे प्रश्न दूर करण्यासाठी एकत्रित व दृढनिश्चितीने कार्य करीत आहोत.
या पत्रात त्यांनी विविध कामांची आणि महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. यामध्ये सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, कलम 370 आणि तीन तलाक यांचा उल्लेख केला आहे. याशिवाय स्थलांतरित मजुरांचे होणारे हाल यावरदेखील त्यांनी पत्रात भाष्य केलं आहे. स्थलांतरित मजुरांसाठी सरकारककडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नाविषयीदेखील त्यांनी पत्रात लिहिलं आहे.
पंतप्रधान मोदी पत्रात नेमके काय म्हणाले आहे ते पाहूया…
माझ्या प्रिय भारतीय मित्रांनो, एका वर्षापूर्वी इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला. देशातील 130 कोटी जनतेने पुन्हा एकदा बहुमताने मोदी सरकारवर जाबाबदारी सोपवली. मी देशाच्या 130 कोटी नागरिकांना आणि लोकशाहीप्रधान विचारांना वंदन करतो.
देशात कोरोनाचं संकट नसतं, सर्वसामान्य परिस्थिती असती तर आज मला आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचं सौभाग्य लाभलं असतं. मात्र, कोरोनाच्या या जागतिक महामारीच्या संकंटात मी पत्रामार्फतच आपल्याशी संवाद साधून आशीर्वाद घेऊ इच्छितो.
आपण लोकशाहीचं ज्याप्रकारे सामूहिक दर्शन घडवलं आहे ते जगभरासाठी एक मार्गदर्शक आहे. गेल्या पाच वर्षात आपण भ्रष्टाचाराला नष्ट केलं. गेल्या पाच वर्षात लाखो गरिबांना मदत करता आली. गरिबांसाठी मोफत गॅस आणि वीज देण्यात आली.
भारताने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं. याशिवय OROP, वन नेशन वन टॅक्स, जीएसटी सारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरु करण्यात आल्या.
काही विषयांवर व्यापक चर्चा झाली. कलम 370 च्या निर्णयाने राष्ट्रीय एकता आणि एकीकरणाची भावनेला चालना दिली. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेला राम मंदिराच्या खटल्यावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक सौहार्दपूर्ण निर्णय घेतला. तीन तलाक सारख्या प्रथेला बंद केलं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त अनेक चांगले निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे भारताच्या विकासाला आणखी गती मिळाली.
संरक्षण कर्मचाऱ्यांच्या प्रमुख पदाचा मुद्दादेखील प्रलंबित होता. देशाच्या तीन सशस्त्र दलांमध्ये समन्वय व्हावा, त्यासाठीदेखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
सरकारची गरिब, शेतकरी, महिला आणि युवकांना सशक्त बनवणं, हीच प्राथमिकता आहे. पीएम किसान सम्मान निधीचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होत आहे. या योजनेअंतर्गत एका वर्षात 9 कोटी 50 लाख पेक्षाही जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 72 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 15 कोटींपेक्षा अधिक घरांमध्ये पाईप कनेक्शनद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आपल्या देशात पहिल्यांदाच असंगठित क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार आणि श्रमिकांना 60 वर्ष वयानंतर 3 हजार रुपये मासिक पेंशन देण्याचं आश्वासन दिलं गेलं आहे. याशिवाय मच्छिमारांसाठी देखील अनेक योजना लागू केल्या आहेत. त्याचबरोबर व्यापाऱ्यांसाठीदेखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
आपण वेगाने पुढे जात होतो. मात्र, कोरोनाच्या संकंटाने भारताला घेरलं. कित्येक लोकांनी अंदाज वर्तवलेला की, कोरोना जेव्हा भारतावर हल्ला करेल तेव्हा भारत संपूर्ण जगासाठी संकंट बनेल. मात्र, आज आपण जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.
टाळ्या-थाळी वाजवण्यापासून ते भारतीय सैन्याद्वारे पुष्पवृष्टीकरुन कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला गेला. तुम्ही लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन केलं. याशिवाय प्रवासी मजुरांच्या समस्यांचंदेखील निराकरण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.