गुलाल फक्त रहाणे कंपनीचा: रहाणेच्या नेतृत्त्वात भारताचा विजय; ग्रामपंचायत निवडणुकीतही रहाणे पॅनेलचा विजय

0
454

भारताने चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाने 3 विकेट्स राखून धडाकेबाज विजयाची नोंद केली. महाराष्ट्राचा सुपुत्र अजिंक्य रहाणे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचं खंबीर नेतृत्त्व करत होता. भारताने चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला आहे. अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाने 3 विकेट्स राखून धडाकेबाज विजयाची नोंद केली. टीम इंडियाने महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीतील गुलाल खाली बसण्यापूर्वीच, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात ब्रिस्बेनमध्येही गुलाल उधळला आहे.

चंदनापुरीतही रहाणेंचं वर्चस्व
अजिंक्य रहाणे हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातला आहे. चंदनापुरी हे त्याचं गाव. राज्यातील जवळपास 14 हजार ग्रामपंचायतींचा निकाल काल जाहीर झाला. चंदनापुरीतही रहाणेंच्या पॅनेलने विजय मिळवला. चंदनापुरी ही 13 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. या गावात रहाणे आडनावाचे बहुसंख्य आहेत. गावच्या या निवडणुकीत अजिंक्य रहाणेच्या घरातील किंवा नातेवाईक कोणीही उमेदवार नव्हतं. पण अजिंक्य रहाणेच्या या गावातील निवडणुकीकडे पंचक्रोशीचं लक्ष होतं.

या निवडणुकीत रामनाथ रहाणे अर्थात आर बी शेठ रहाणे यांच्या शेतकरी विकास मंडळाने बाजी मारली. 13 पैकी तब्बल 10 जागांवर विजय मिळवून, सत्ता काबीज केली. त्यांच्या विरोधातील ग्रामविकास मंडळाला तीन जागा मिळाल्या. या पॅनलचं नेतृत्त्व रामभाऊ रहाणे करत होते. चंदनापुरी हे गाव रहाणेंचं गाव म्हणून ओळखलं जातं.

मैदान राजकीय असो की क्रिकेटचं, रहाणेंचा दबदबा ठरलेला असतो हे आजच्या दोन्ही निकालांवरुन स्पष्ट होतंय. नगरचा हा सुपुत्र ब्रिस्बेनमध्ये गुलाल उधळतोय, तर रहाणेंचं पॅनेल चंदनापुरीत जल्लोष करतंय.