शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन

0
270

पुण्यातील खेड तालुक्यातील शिवसेनेचे (Shiv Sena) माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन झाले आहे. ते 55 वर्षांचे होते. त्यांना कोरोना संसर्ग झाल्याने गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेस मृत्यूशी त्यांची सुरू असलेली झुंज आज सकाळी अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, आई असा परिवार आहे.

सुरेश गोरे हे खेड आळंदी मतदारसंघाचे 2014 ते 2019 दरम्यान आमदार होते. तसंच त्यांनी चाकण जिल्हा परिषद गटाचे सदस्य आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदही भूषवले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांना 2009 साली खेडची उमेदवारी देऊ केली होती. मात्र नंतर काही कारणास्तव ती रद्द करण्यात आली. दरम्यान, 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.त्यां च्या शांत, मनमिळाऊ व संयमी स्वभावामुळे त्यांनी राजकारण व समाजकारणात वेगळं ठसा उमटवला होता. तालुक्यात सुरेश गोरे यांनी भाऊ या नावाने आपली ओळख निर्माण केली होती.

विरोधकांवरही संयमी टीका करणारा हा नेता सदैव हसतमुख असायचा. कार्यकर्त्यांच्या कायम गराड्यात असणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने खेड तालुक्याला धक्का बसला असून मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. सुरेश गोरे हे माजी खासदर शिवाजी आढळराव, महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी होते.