ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा: ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु; १५ हजारहून अधिक उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

0
285

कोरोना संकटानंतर राज्यात प्रथमच ग्रामपंचायत निडणुकीचा धुराळा उडणार आहे. राज्यात बुधवारी १४ जानेवारीला ग्रामपंचाय निवडणूकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आज महाराष्ट्रात एकूण ३४ जिल्ह्यांतील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकांसाठी मतादानाची प्रक्रिया सकाळी ७.३० वाजता सुरु झाला आहे. तर संध्याकाळी ५.३० वाजता मतदान प्रक्रिया बंद करण्यात येईल. ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात आज 650 ग्रामपंचायतसाठी मतदान होत आहे. 4904 जागांसाठी अकरा हजार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून उरुळी कांचन ग्रामपंचायतकडे पाहिली जाते. पुणे शहराला लागून या ग्रामपंचायतची हद्द आहे. या ग्रामपंचायतच्या हद्दीत मोठमोठ्या इमारती मोठमोठे उद्योगधंदे असल्यामुळे एक वेगळे महत्व या ग्रामपंचायत निवडणुकीला आले आहे. आज सकाळपासून या गावात मतदानाची लगबग सुरु आहे.

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुक घेण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षाचा समावेश असला तरी यामध्ये राजकीय पक्षाच्या चिन्हाचा वापर होत नाही.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

प्रभाग – 46,923

जागा – 1,24,819

उमेदवार : अडीच लाखांहून अधिक