निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरण;शिवसेना कार्यकर्त्यांना अटक

0
241

मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्याने शिवसैनिकांनी एका ६२ वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची गंभीर घटना कांदीवलीतील समतानगर भागात घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी चार शिवसैनिकांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोन शिवसैनिकांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे कमलेश कदम आणि आणखी एका सदस्याचा समावेश आहे. त्या अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर समता नगर पोलीस ठाण्यात ८ ते १० जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई त्या दोघांना अटक केली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या सहा जणांमध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख कमलेश कदम आणि कार्यकर्ता संजय मांजरे यांचा समावेश आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं एक कार्टून शेअर केल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांकडून आपल्यावर हल्ला करण्यात आला.

कांदीवलीतील समतानगर येथे लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास काही शिवसैनिकांनी हा हल्ला केला. मदन शर्मा या निवृत्त अधिकाऱ्यावर हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत शर्मा यांच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

गुंडाराज थांबवा, भाजपची टीका
या प्रकरणी विविध राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत असून यामुळे पुन्हा मुंबई मध्ये राजकीय युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. ही घटना अत्यंत निषेधार्ह असून गुंडाराज थांबवा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर अभिनेत्री कंगना रनौतने देखील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कंगना म्हटलं आहे की, एका माजी सैनिकाला अशा पद्धतीनं बेदम मारहाण केली. झुंडीनं केलेली मारहाण निषेधार्ह आहे. त्या व्यक्तीची चूक एवढीच होती की त्याने सरकार विरोधात कमेंट केली. या प्रकरणात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा, असं कंगनानं म्हटलंय.