पदवीधर मतदारसंघ निवडणूक म्हणजे आहे तरी काय?

0
903

आपल्याकडे निवडणुकांना विशेष महत्त्व असते. ग्रामपंचायत पासून ते लोकसभा निवडणुका जवळ आल्या की त्याचा प्रभाव सर्वांवर पहिला मिळतो. पण एक निवडणूक अशी आहे ज्याकडे एवढ्या गांभीर्याने पाहिलं जात नाही ती निवडणूक म्हणजे पदवीधर मतदारसंघ निवडणूक. आपण आज जाणून घेणार आहोत नक्की काय असते पदवीधर मतदारसंघाची निवडणूक.

राज्यात विधान परिषद या वरिष्ठ सभागृहाचे एकूण 78 सदस्य आहेत. यातले 31 सदस्य म्हणजे विधानसभेतले आमदार निवडून देतात, 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात.

तर 12 जणांची नेमणूक राज्यपालांकडून होते आणि 7 उमेदवार शिक्षक मतदारसंघातून तर 7 पदवीधर मतदारसंघातून येतात. हे पदवीधर मतदारसंघ आहेत मुंबई, कोकण, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि अमरावती.

विधानपरिषदेच्या सदस्यांचा निवडणूका एकाच वेळी होत नाहीत विधानपरिषद हे कायम सभागृह असते त्यातील सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो परंतु दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होत असतात व तितकेच नवीन नेमले जातात. महाराष्ट्रात सात पदवीधर मतदार संघ आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे, कोकण, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती या मतदारसंघाचा समावेश होतो.

पुणे पदवीधर मतदारसंघात पाच जिल्हे असून त्यामध्ये 58 तालुके तर 6669 गावाचा समावेश आहे. गतपंचवार्षिक निवडणुकिपेक्षा मतदान नोंदणीस अल्प प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत चार लाखाच्या वर मतदार नोंदणी झाली आहे.पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा,सांगली ,कोल्हापूर,सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे

पदवीधर मतदारसंघासाठी १ डिसेंबर २०२० मध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पदवीधर असणाऱ्या व्यक्तींकडून छापील स्वरूपात अर्ज मागवण्यात आले आहेत. पदवीधर मतदारसंघातून निवडून जाणारा आमदार ६ वर्ष पदवीधर वर्गाचे प्रश्न सभागृहात मांडत असतो. त्याच प्रमाणे शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रात सरकारचे धोरण काय असावे या संदर्भात सभागृहात भाष्य करणे या आमदाराकडून अपेक्षित असते.

पुणे पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी पात्रतेच्या अटी

१. मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याऱ्या व्यक्तीने १९४७ ते २०१७ या कालावधीत कोणत्याही शाखेचे किमान पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. अर्थात तो व्यक्ती पदवीधर (Graduate) असावी

२. मतदार म्हणून नाव नोंदणी करू इच्छिणारी व्यक्ती पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पैकी कोणत्याही एका जिल्ह्याची कायमची रहिवासी असावी.

३. पदवीची आणि रहिवासाची सर्व कागदपत्रे त्याने छापील अर्जाला जोडून देणे आवश्यक.

पदवीधर मतदारसंघ निवडणूक – कुणी करायचं मतदान?

यंदाची निवडणूक होणार आहे ती 1 डिसेंबरला आणि मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. पण या निवडणुकीसाठी मतदान करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागते.

प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नवीन नोंदणी असते. आणि बॅलट म्हणजे मतपत्रिकेवर शिक्का मारूनच मतदान होतं. त्यामुळे मतदारसंघात हजर राहून मतदान करणं आवश्यक आहे.

मतदारासाठीचे निकष काय आहेत ते ही पाहूया…

1. मतदार भारतीय नागरिक असावा

2. मतदारसंघाचा रहिवासी असावा

3. निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याच्या तारखेपूर्वी तीन वर्षं आधी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

4. विहित फॉर्म 18 भरावा लागेल