हौसेला मोल नाही; पुण्यामध्ये कोरोनाला हरविण्यासाठी आता गोल्ड मास्क

0
524

(पुण्यातील एका व्यक्तीने कोरोनापासून आपले संरक्षण व्हावे, म्हणून चक्क सोन्याचे मास्क घातले आहे)

करोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. यात पुणेकरही मागे नाहीत. पिंपरी चिंचवडमधील एका हौशी व्यक्तीने चक्क सोन्याचा मास्क बनवला आहे.हे अनोखं मास्क पुण्यातील एका व्यक्तीने जवळपास 3 लाख रुपयांना बनवलं आहे. सध्या या व्यक्तीची, त्याच्या सोन्याची मास्कची मोठी चर्चा होताना दिसत आहे.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड या भागात राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव शंकर कुरडे असून त्याने कोट्यावधी रुपये खर्च करून सोन्याचे मास्क तयार करून घेतले आहे. शंकर यांच्या मास्क किंमत २.८९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शंकर कुराडे हे गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत, कारण ते मास्क शिवाय इतरही अनेक सोन्याचे दागिने घालतात.

सध्या, त्यांचे सोन्याचा मास्क परिधान केल्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तसेच त्यांना सोन्याची खूप आवड आहे आणि तो नेहमीच अंगावर ३ किलो सोनं घालतात. दहा बोटाने सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या गळ्यात साखळ्या आणि मनगटात ब्रेसलेट नेहमी शंकर यांच्या जवळ असते.

याबाबत शंकर कुराडे यांनी सांगितलं की, हे एक पातळ मास्क आहे आणि याला छोटं छिद्र आहे. छिद्र असल्यामुळे या मास्कमधून श्वास घेण्यास कोणताही त्रास होत नाही. परंतु कोरोना व्हायरसपासून हे मास्क बचाव करु शकतं की नाही ते सांगू शकत नसल्याचं ते म्हणाले. त्यांनी असेही सांगितले की, टीव्हीवर एकदा चांदीचे मास्क घातलेल्या व्यक्तीला पाहिले त्यानंतर मी देखील सोन्याचा मास्क तयार करण्याचा विचार केला.