पुणेकरांनो आता फक्त ५ रुपयांत करा ५ किलोमीटर प्रवास; पीएमपीएलची नवीन योजना

0
366

पुणे म्हणलं की, पीएमपीएमएल आलीच. पीएमपीएमएलने प्रवास करणारा एक मोठा वर्ग पुण्यात राहतो. बरेच लोक बसने प्रवास करतात. आता पीएमपीएलने दसऱ्याच्या निमित्ताने नागरिकांना एक खास भेट दिली आहे. ‘पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ‘अटल’ बस सेवेला आज सुरुवात झाली. या अंतर्गत पुणेकरांना पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास अवघ्या ५ रुपयांत करता येणार आहे. दर पाच मिनिटाला ही सेवा उपलब्ध असेल.

या सेवेमध्ये प्रत्येक पाच मिनिटांनी गाड्या उपलब्ध होतील असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये एक मध्यभाग निश्चित करून त्याच्या पाच किलोमीटर परिघामध्ये गाड्या जातील. पुण्यात हा मध्यभाग महापालिका मुख्य इमारत आणि पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड असेल. पुणे महानगरपालिकेपासून ५ किलोमीटरसाठी ९ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. येथून फक्त ५ रुपयांत कोणत्याही मार्गावर जातील. या सर्व छोट्या गाड्या आहेत. त्यासाठी १८० गाड्या वापरण्यात येणार आहेत. दर ५ मिनिटांनी नवी गाडी असणार आहे.

अटल’ योजनेअंतर्गत पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, महापालिका भवन आणि पूलगेट अशा शहराच्या महत्त्वाच्या स्थानकांवरून सरासरी तीन ते सहा किलोमीटरच्या अंतरातील नऊ मार्गांवर दर पाच मिनिटांनी बस धावणार आहे. कोणत्याही अंतरासाठी पाच रुपये तिकीट आकारले जाणार आहे. प्रवाशांना शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी ही उत्तम सेवा ठरणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, सभागृह नेते धीरज घाटे, आयुक्त विक्रमकुमार, पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, संचालक शंकर पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ‘रस्त्यावरच ट्रॅफिक कमी करायचं असेल तर चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा देणं आवश्यक आहे. वेळ आणि पैसे वाचत असतील तर लोक नक्की या सुविधेचा वापर करतील, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच, राज्यातील अन्य महापालिका या योजनेचे अनुकरण करतील, असेही ते म्हणाले.

लांब अंतराच्या मार्गावरील बसेसची वांरवारता तुलनेने कमी असते. ती बस निघून गेली की पुन्हा त्याच नंबरची बस येईपर्यंत प्रवाशांना वाट पहावी लागत असे परंतु अटल बस सेवेमुळे त्याच मार्गावर जाणाऱ्या दुसऱ्या पर्यायी तात्काळ उपलब्ध होणार आहेत. ‘सदर फीडर बससेवेमुळे प्रवाश्यांच्या वेळेत बचत होईल आणि पीएमपीची सेवा अधिक सक्षम होईल. उदाहराणार्थ; स्वारगेटपासून पिंपरी-चिंचवडला जाणारी बस निघून गेली तर पुन्हा त्याच बसची वाट पाहण्याची आवश्यकता भासणार नाही. अटल सेवेतील स्वारगेट ते शिवाजीनगर बस पाच मिनिटात मिळेल व त्यातून पाच रुपयांत शिमला ऑफिस, शिवाजीनगर येथे जाता येईल, जेणेकरून तिथे पिंपरी-चिंचवडला जाणाऱ्या इतर अनेक बसेस त्वरीत उपलब्ध होतील. यामुळे प्रवाशाचा वेळ व पैसा वाचणार आहे.