पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरचं उपचारासाठीचं दिलेलं कंत्राट काढून घेण्यात आलं आहे. लाईफ लाईन या एजन्सीला याबाबत कंत्राट देण्यात आलं होतं. अनेक तक्रारी, रुग्णांची होणारी परवड आणि पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर चौकशी बाबत विचारण्यात आलेला खुलासा, यावरून लाईफ लाईन एजन्सी चांगलीच गोत्यात आली होती. अनेक तक्रारी, रुग्णांची होणारी परवड आणि पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर चौकशी बाबत विचारण्यात आलेला खुलासा, यावरून लाईफ लाईन एजन्सी चांगलीच गोत्यात आली होती. आणि त्याच दरम्यान एजन्सीच्या १२० डॉक्टर,नर्सिंग स्टाफने दिलेला राजीनामा यावरून लाईफ लाईन या एजन्सीचे काम थांबवून पालिकेककडे यांचं नियंत्रण देण्यात आलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेसह काही सरकारी स्टाफ नेमण्यात आला आहे.
पुण्यातील जंबो कोविड सेंटरमधल्या याच अनागोंदी कारभाराच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चानं बुधवारी आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी पीएमआरडीए अध्यक्ष सुहास दिवसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनावेळी दिवसे उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीची तोडफोड केली. कोरोनाशी लढताना राज्यातल्या आरोग्य यंत्रणांचा कारभार चव्हाट्यावर येत आहे.
आता प्रशासन आणि महानगरपालिका जम्बो कोविड सेंटरवर कशा प्रकारे काम करतील आणि नागरिकांचा विश्वास कशाप्रकारे परत मिळवतील यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. एकीकडे पुण्यात सध्या कोरोनामुळे अवस्था बिकट होत चालली असून यावर योग्य तो निर्णय प्रशासनाला आणि महानगरपालिकेला लवकरच घ्यावा लागणार आहे असे चित्र पाहायला मिळताना दिसत आहे. रुग्ण बरे होत असताना मृत्युदर ही वाढताना दिसत असल्याने पुण्यात सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
जर प्रशासन आणि महानगरपालिकेने मिळून योग्य तो निर्णय घेत आणि चांगल्याप्रकारे व्यवस्था बजावली तर पुण्यातही नक्कीच कोरोना आटोक्यात येऊ शकतो. आता फक्त गांभीर्याने काम करण्याची गरज आहे.