पुण्यातील मागील दहा दिवसांचा लाॅकडाऊन संपुष्टात येत असला तरी नागरिकांवर यापुढील काळात ही आधीप्रमाणेच निर्बंध असणार आहे. राज्यसरकारचा लाॅकडाऊन 31 जुलै पर्यंत असल्याने ताेपर्यंत आधीची बंधने आहे त्याप्रमाणेच असणार आहे. लॉकडाऊन शिथील करतेवेळी सदर भागामध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या नियमावलीनुसार प्रतिबंधीत क्षेत्रांमध्ये लॉकडाऊनचे नियम अद्यापही लागू असतील. तर, त्याव्यतिरिक्त इतर भागांमध्ये भाजी मंडई, फळ बाजार, आणि इतर दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शहरातील दुकानं ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहतील. पी1 आणि पी2 म्हणजेच सम- विषम तत्त्वाअंतर्गत ही दुकानं खुली राहणार आहेत. त्याशिवाय लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी सलून आणि ब्युटी पार्लर ज्या तत्त्वांअंतर्गत कार्यरत होते, त्याचनुसार ते सुरु राहतील. महानगर पालिकेा हद्दीत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक सेवा किंवा कारण वगळता रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बाहेर जाता येणार नाही. ६५ वर्षे वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, १० वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं यांना अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य विषयक अडचणींशिवाय बाहेर जाता येणार नाही. २४ जुलैपासून पुढील आदेश मिळेपर्यंत हे आदेश कायम असणार आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रात विशिष्ट गल्ली, चाळ, वसाहत, इमारती, गृह निर्माण संस्था या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आढळल्यास त्या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी हे ते विशिष्ट क्षेत्र, विभाग, चाळ, इमारत किंवा गृहनिर्माण सोसायटी लगेच सील करतील.
प्रतिबंधित क्षेत्राबाहेर विशिष्ट क्षेत्र, चाळ, वसाह, इमारत किवा गृहनिर्माण सोसायटी येथे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आढळल्यास त्या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी हे ते विशिष्ट क्षेत्र, विभाग, चाळ, इमारत किंवा गृहनिर्माण सोसायटी लगेच सील करतील.
5 दिवस अनलॉक, 2 दिवस लॉकडाउनवर विचार
पुणे व्यापारी असाेसिएशनने प्रशासनाकडे दाेन पत्र आम्हास दिली असून त्यात एका पत्रात शनिवार, रविवार पूर्णपणे लाॅकडाऊन असावा तर दुसऱ्या पत्रात मंगळवार आणि बुधवार लाॅकडाऊन असावा अशी मागणी केली आहे. त्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. शहरातील बाजार पेठेतील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात यादरम्यान चालू राहतील, दुकानदारांना सम-विषम प्रमाणे दुकाने उघडण्यास परवानगी असणार आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून याचा विरोध होत आहे.
पुणेकरांना ह्या गोष्टींसाठी मुभा:-
- प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सार्वजनिक ठिकाणी आणि मैदानांवर व्यायाम करता येईल. धावणे, सायकलींग करता येईल. मात्र जीम बंद राहतील.
- सकाळी ५ ते ७ व्यायाम करता येणार .. लगान मुलांसोबत मोठी व्यक्ती हवी , मैदानांवर गर्दी करता येणार नाही , व्यायामाची सामायिक उपकरण वापरता येणार नाहीत (ओपन जिम)
- दुकाने पी१ पी२ प्रमाणे सुरू राहतील
- खासगी कार्यालये १० टक्के किंवा १५ जण यापैकी जे अधिक तितक्या लोकांना बोलवून कामकाज करू शकतील
- हाॅटेल्स रेसिटाॅरंट माॅल्स जीम, व्यापारी संकुल, पोहण्याचे तलाव बंदच राहणार
- पार्सल, कुरियर सुरू
- घरमालकाची परवानगी असल्यास घरेलू कामगार , जेष्ठ रूग्ण मदतनीस (प्रतिबंधित क्षेत्राबाहेर)
- सगळीकडे मास्क वापरणं बंधनकाराक