Navratri 2020: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात

0
378

आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. नवरात्रीचं पावन पर्व दुर्गामातेसाठी समर्पित आहे. देवी दुर्गेला शक्ती आणि उर्जेचं प्रतिक मानलं जातं. नवरात्रीत दुर्गेच्या सर्व नऊ रुपांची विधिवत पूजा अर्चा केली जाते. नऊ दिवस घरोघरी घट बसवले जातात. दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी लांबचलांब रांगा लागतात. देवीची साडेतीन पिठं भक्तांनी फुलून जातात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं भाविकांसाठी बंद आहेत. त्यामुळे शारदीय नवरात्रोत्स यंदा भक्तांशिवाय साजरा केला जाणार आहे. मंदिरांध्ये मात्र विधीवत पूजा कऱण्यात येणार आहे.

शनिवार, १७ सप्टेंबर २०२० रोजी असून, या दिवशी घटस्थापना करून नवरात्रारंभ होईल. २५ ऑक्टोबर २०२० रोजी नवरात्राची सांगत होईल. या नऊ दिवसात देवीच्या विविध नवरुपांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवी, तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवी, चौथ्या दिवशी कुष्मांडा देवी, पाचव्या दिवशी स्कंदमाता देवी, सहाव्या दिवशी कात्यायणी देवी, सातव्या दिवशी कालरात्रि देवी, आठव्या दिवशी महागौरी देवी, नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी विधिवत घटस्थापना केली जाते.

दरम्यान, नवरात्रोत्सवात अनेक भाविक देवीचा जागर करण्यासाठी उपवास देखील करतात. काही जण घटस्थापानेपासून पुढील नऊ दिवस उपवास करतात. यामध्ये काहींचा निर्जळी उपवास असतो, तर काही जण केवळ घट उठता बसता म्हणजे अश्विन शुक्ल प्रतिपदा आणि अष्टमी, नवमी याच दिवशी उपवास करतात आणि दसर्‍याच्या दिवशी हे उपवास सोडले जातात.

देवीची पूजाअर्चा करून रासगरबा ज्याला सध्या दांडिया असे म्हटले जाते हे खेळ रंगतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसचे या उत्सवावर आणि उत्साहावर सावट असल्यामुळे लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येण्याचे आव्हान केले जात आहे. यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी फिरले यंदा हा उत्सव कसा साजरा करायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यंदा रास दांडिया नसल्याने तरुणाईही हिरमुसली आहे. मात्र यंदा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही नवरात्री साजरी करू शकता.