अंडर-19 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत विरुध्द बांग्लादेश यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. रविवारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. भारतीय संघाने पहिल्या सेमीफायनल मध्ये पाकिस्तान संघाला १० विकेट्सने हरवत आपणच वर्ल्डकपचे खरे हक्कदार आहोत असे सांगितले आहे.
तर दुसऱ्या सेमीफायनल मध्ये बलाढ्य अशा न्यूझीलंडला हरवून बांगलादेश संघाने प्रथमच फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे आणि भारताला एकप्रकारे सज्ज राहण्याचा इशाराही दिला आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात रविवारी ९ फेब्रुवारीला अंडर-१९ वर्ल्ड कपची फायनल खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता हा सामना सुरु होईल. याआधी २०१८ साली झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड कपवरही भारताने नाव कोरलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा ही ट्रॉफी आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.
भारतीय टीमने आतापर्यंत ४ वेळा अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला आहे. २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली भारताने अंडर-१९ वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं.
भारतीय संघाची असणार या प्रमुख खेळांडूवर मदार:-
यशस्वी जयस्वाल, कार्तिक त्यागी, रवी बिष्णोई आणि दिव्यांश सक्सेना
बांगलादेश संघाची असणार या प्रमुख खेळांडूवर मदार:-
महम्मदूल हनस जॉय, शोरीफूल इस्लाम, शमीम हुसेन आणि शहादत हुसेन