आयपीएलला अवघे काही तास बाकी; अतिभव्य स्टेडियम सज्ज, स्टेडियमला रोषणाई

0
312

यंदाच्या वर्षी IPL 2020 वर कोरोना व्हायरसचं सावट आहे. मार्च एप्रिल मध्ये होणारी आयपीएल यावेळी कोरोनामुळे सप्टेंबरला होत आहे तेही दुबईला. भारतामध्ये परिस्थिती प्रतिकूल नसल्याने यंदा ही स्पर्धा दुबई येथे आयोजित करण्यात आली आहे.आयपीएलच्या यजमानासाठी अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियम सज्ज झाले आहे. याच मैदानावर मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्जदरम्यान सलामी सामना खेळवला जाईल. त्याचबरोबर येथे १९ लीग सामने होतील.

दुबई येथेही तितक्याच उत्साहात ही स्पर्धा होणार आहे कारण याचीच प्रचिती येत आहे या स्पर्धेसाठी सज्ज असणाऱ्या भव्य, अतिभव्य स्टेडियमकडे पाहून. नुकतंच दुबई आणि अबूधाबी येथील स्टेडियमचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले. जे पाहून अनेकांचेच डोळे दीपले.

अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियम सज्ज झाले आहे. अंदाजे १०० काेटींचे असलेल्या स्टेडियममध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना २००६ ला भारत व पाक यांच्यात झाला हाेता. आता कोरोनामुळे चाहत्यांना सध्या बंदी आहे. आयपीएल २०१४ मध्ये येथे ७ सामने खेळवण्यात आले होते.

अबू धाबी आणि दुबई मधील ज्या मैदानांवर आयपीएलचे सामने होणार आहेत त्याचे फोटो बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोत दोन्ही स्टेडियमचे एरियल व्ह्यूचे फोटो घेतले आहेत. दोन्ही स्टेडियमवर रोषणाई केली आहे. ज्या प्रमाणे ऑलिंपिक सारख्या स्पर्धेतवेळी रोषणाई केली जाते त्याच प्रमाणे ही रोषणाई दिसत आहे.

फक्त तीन दिवस शिल्लक, दुबई आणि अबू धाबी स्टेडियमची शानदार दृश्य. या वर्षीच्या आयपीएलचे आयोजन करण्यासाठी युएई तयार आहे. संपूर्ण जग तयार आहे आणि म्हणून आम्हीही तयार आहोत.