रणजी करंडक; सौराष्ट्राने पटकाविले पहिल्यादांच विजेतेपद

0
372

अंतिम सामन्यात पश्चिम बंगालविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे सौराष्ट्रच्या संघाने पहिले रणजी विजेतेपद मिळवले. सौराष्ट्र संघाने पहिल्या डावात ४२५ धावा केल्या होत्या. तर पश्चिम बंगलाने पहिल्या डावात ३८१ धावा केल्या. रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात 30 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेल्या बंगालचं स्वप्न धुळीस मिळाले.

सामन्याच्या शेवटच्या दिवशी बंगालला जिंकण्यासाठी 72 धावांची गरज होती. तर सौराष्ट्रला 4 गडी बाद करण्याची गरज होती. सौराष्ट्रनं यात बाजी मारत बंगालच्या बाकी गड्यांना बाद केलं. शेवटच्या दिवशी अनुष्टुप मजूमदार आणि अर्णब बेदी यांनी खेळ सुरु केला. या दोघांनी चौथ्या दिवशी डाव सावरला होता. मात्र शेवटच्या दिवशी सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटनं मजूमदारला स्थिरावण्यास वेळच दिला नाही. मजूमदार 63 धावांवर खेळत असतानाच पायचित झाला. त्याच षटकात जयदेवनं आकाशदीपला धावबाद केलं. सौराष्ट्राच्या गोलंदाजाची अप्रतिम कामगिरीमुळे बंगालला 381 धावांवर रोखण्यात यश आले. विजेतेपदाच्या लढतीत सौराष्ट्रने बंगालवर पहिल्या डावात घेतलेल्या 44 धावांच्या आघाडीच्या जोरावर रणजी करंडक 2019-20 स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला.

सौराष्ट्रने गेल्या 8 वर्षाच्या कालावधीत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली होती, पण चारही वेळेस त्यांना अपयश हाती आलं होतं. त्यानंतर आज बंगालवर मात करत अखेर त्यांनी विजेतेपद पटकावले. तर बंगलाने 1989-90 साली रणजी करंडक स्पर्धा जिंकली होती. तीस वर्षानंतर यंदा त्यांना पुन्हा एकदा विजेतेपद पटकविण्याची संधी होती, मात्र त्यांना अपयश आलं.

सौराष्ट्र पहिला डाव –
171.5 षटकांत सर्वबाद 425. (अर्पित वासवदा 106, चेतेश्‍वर पुजारा 66, अवी बारोट 54, विश्‍वराज जडेजा 54, चिराग जानी 14, धर्मेंद्रसिंह जडेजा नाबाद 33, जयदेव उनाडकट 20, आकाश दीप 4-98, शाहबाज अहमद 3-103, मुकेश कुमार 2-103)
सौराष्ट्र दुसरा डाव –
अवी बोराट 39, एच देसाई 21, विश्‍वराज जडेजा 17, शेल्डन जॅक्सन नाबाद 12, आकाशदीप 1-13, शाहबाज अहमद 2-33)
विरूध्द
बंगाल पहिला डाव –
161 षटकांत सर्वबाद 381. (सुदीप चटर्जी खेळत आहे 81, सुदीप कुमार 26, मनोज तिवारी 35, वृद्धिमान साहा 64, अनुस्तुप मुजुमदार 63, अर्णब नंदी नाबाद 40, जयदेव उनादकट 2-96, प्रेरक मांकड 2-45, धर्मेंद्रसिंह जडेजा 3-114).

(पहिल्या डावाच्या ४४ धावांच्या आघाडीवर सौराष्ट्र विजयी)