वृद्धिमान साहा प्रकरण: कोण बरोबर? कोणाची चुकी?

0
285

भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने रविवारी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी अप्रत्यक्षपणे आपल्याला निवृत्ती पत्करण्याचे संकेत दिले, असा आरोप शांत स्वभावाच्या साहाने केल्यामुळे चाहत्यांमध्ये याविषयी चर्चा रंगत आहे.

माझे कोणाशीही वैर नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर प्रशिक्षक द्रविडने मला वैयक्तिक खोलीत बोलावत भविष्यातील आव्हानांची कल्पना दिली. श्रीलंकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्याचे संघ व्यवस्थापनाने ठरवले आहे. त्यामुळे तुला संघातून वगळले, तर निराश होऊ नकोस. यादरम्यान, अन्य कोणताही निर्णय घेण्यासाठी तू मोकळा आहेस, असे द्रविड म्हणाल्याने मला धक्का बसला,’’ असे साहा म्हणाला.

टीम इंडियाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज वृद्धिमान साहाने एकामागून एक खुलासे करून खळबळ उडवून दिली आहे. वृद्धिमान साहाने अलीकडेच एका पत्रकारावर मुलाखतीसाठी धमकी दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीसीसीयाने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. वृद्धिमान साहाने सोशल मीडियावर मुलाखतीसाठी धमकी देणाऱ्या पत्रकाराच्या व्हॉट्सअॅप संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. त्यानंतर मोठा गदारोळ माजला होता.

बीसीसीआय अॅक्शनमोडमध्ये
वृद्धिमान साहाच्या आरोपांनंतर आता बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये आली आहे. बीसीसीआयने याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. साहा बीसीसीआयशी करारबद्ध खेळाडू आहे, अशा परिस्थितीत बोर्ड आपल्या खेळाडूंना एकटे सोडू शकत नाही.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. साहाने केलेल्या आरोपांची चौकशी बोर्ड चौकशी करणार आहे. याआधी कोणत्या क्रिकेटपटूला अशा धमक्यांचा सामना करावा लागला आहे का, याचाही बोर्ड शोध घेणार आहे. मात्र, त्याआधी बीसीसीआयने साहाला त्या व्यक्तीचं नाव बोर्ड अधिकाऱ्यांकडे उघड करण्यास सांगितलं आहे.

मुलाखतीसाठी पत्रकाराने दिली होती धमकी?
वृद्धिमान साहाने ट्विटरवरचा एक स्क्रीनशॉट शेअर केला होता, ज्यामध्ये पत्रकाराने त्याला सांगितले होतं की, त्याला साहाची एक मुलाखत घ्यायची आहे आणि हे तुझ्यासाठी चांगले असेल. निवडकर्त्यांनी केवळ एका यष्टीरक्षकाची निवड केली आहे. आणि तू ११ पत्रकार निवडण्याचा प्रयत्न केला. ही बाब माझ्या मते योग्य नाही. त्यांची निवड करा जे तुमची अधिकाधिक मदत करू शकतील. पण तू कॉल केला नाहीस. मी आता तुझा कधीही इंटरव्यू घेणार नाही आणि ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवीन.

द्रविडने सोडले मौन

मला अजिबात वाईट वाटलेलं नाही

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी शनिवारी संघ जाहीर झाला. त्यानंतर हा सर्व वाद निर्माण झाला. निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात मोठे बदल केले आहेत. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, ऋद्धीमान साहा आणि इशांत शर्मा यांना डच्चू दिला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर राहुल द्रविड यांनी ऋद्धीमान साहाशी चर्चा करताना त्याला निवृत्तीचा विचार करण्याचा सल्ला दिला होता. “ऋद्धीमानच्या वक्तव्याचं मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. भारतीय क्रिकेटमध्ये ऋद्धीमानचं योगदान आणि त्याच्या कामगिरीचा मला आदर आहे. भविष्याबद्दल त्याला स्पष्टता असली पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं” असं राहुल द्रविडने सांगितलं.

असा अवघड संवाद साधावा लागतो

“मी जे खेळाडूंना म्हणतोय, ते त्यांना आवडो अथवा न आवडो, पण मी त्यांच्याशी असा संवाद साधत राहीन” असं द्रविडने स्पष्ट केलं. मी जे म्हणतो त्याच्याशी खेळाडू नेहमीच सहमत असतील, असं नाही. खेळाडूंबरोबर काही वेळेला तुम्हाला असा अवघड संवाद साधावा लागतो, असं द्रविड म्हणाला. “सामन्यासाठी संघ निवडतानाही मी खेळाडूंबरोबर असाच संवाद साधतो. संघात ते का खेळत नाहीयत, हा प्रश्न विचारला पाहिजे. खेळाडू नाराज होणं, त्यांना वाईट वाटण स्वाभाविक आहे” असं द्रविड म्हणाला.