आज भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केदार जाधव याचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्याला शुभेच्छा मिळणाऱ्यांची प्रक्रिया सुरूच आहे. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधव हा आज ३५ वर्षांचा झाला. आपल्या वाढदिवशी एक चांगले काम केदारने केल्याचे पाहायला मिळाले आहे आणि हे काम करून त्याने कोणताही गाजावाजा न केल्याचे पाहायला मिळत आहे.
भारताचा मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधवने आपल्या वाढदिवशी एक पुण्याचे काम केले आहे. आपल्या दिवशी एका गरजी व्यक्तीला रक्तदान करत केदारने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच चाहते केदारवर भारी खूष असून वेन डन केदार, अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याला देत आहेत. ब्लड सेवा परिवार या संस्थेने केदारचा फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला असून याबाबतची माहिती दिली आहे. पण आपल्या वाढदिवशी केदारने हे काम करत सर्वांची मने नक्कीच जिंकली आहेत. सध्याच्या घडीला भारतामध्ये लॉकडाऊन आहे. आयपीएलही पुढे ढकलले गेले आहे. काही क्रिकेटपटू ट्विटवरून लोकांना आवाहन करण्याचे काम करत आहेत. पण केदारने माात्र आपल्या वाढदिवशी एरा गरजू व्यक्तीला रक्तदान करत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
जाधवने गुरुवारी वाढदिवसानिमित्त आपल्या गावी पुण्यात मदतीसाठी आवश्यक असलेल्या व्यक्तीला रक्तदान केले. केदार जाधव यांचा 26 मार्च 1985 रोजी जन्म झाला असून आज त्याचा 35 वा वाढदिवस आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकामुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतर केदार आपल्या घरी परतला. सामाजिक बांधिलकीचे ध्यानात ठेवून गरजूंना रक्तदान केल्याबद्दल केदारचे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.
व्हिडिओ शेअर करताना केदारने कॅप्शनमध्ये लिहिले की, “गरजू लोकांना रक्त देऊन मी आपले काम करत आहे. स्वत: ला सुरक्षित ठेवा आणि घरातच रहा.” या व्हिडीओमध्ये केदार पडून रक्तदान करत असल्याचे दिसून येत आहे. त्याने हातात एक बॉल धरला आहे. तो कॅमेराच्या मागच्या एखाद्याशी मराठीतही बोलत आहे आणि हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे सांगत आहे. समाजावरसाठी ही आपली जबाबदारी आहे आणि मानवजातीसाठी हे माझे छोटे कार्य आहे. या व्हिडिओसह त्याने वी केअर, डोनेट ब्लड, फाइट कोरोना आणि इंडिया फाइट कोरोना (India Fight Corona) हॅशटॅग देखील दिले आहेत.