ऑस्ट्रेलियाच्या आगामी दौरा: भारताच्या वनडे, टी-20, कसोटी संघाची घोषणा; युवा खेळाडूंना संधी

0
266

टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाच्या आगामी दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ नाेव्हेंबरमध्ये प्रत्येकी तीन वनडे, टी-२० आणि चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दाैरा करणार आहे. याच दाैऱ्यासाठी मंगळवारी भारताच्या या तिन्ही संघांची घोषणा करण्यात आली. काेहलीच्या कणखर नेतृत्वात भारताचे हे तिन्ही संघ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपले नशीब आजमावणार आहेत. आयपीएलमध्ये सरस कामगिरी करणाऱ्या युवांंना या दाैऱ्यात संधी मिळाली आहे.

टीम इंडियात रोहित शर्मासह वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यालाही वगळण्यात आले आहे. बीसीसीआयचा वैद्यकीय टीम या दोघांच्या दुखापतींवर लक्ष ठेवून आहे. सध्याच्या घडीला रोहित आणि इशांत यांना आयपीएलमध्ये दुखापत झाल्याने त्यांना वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. रोहित आणि इशांत दुखापतीमधून कसे सावरतात आणि कधी पूर्णपणे फिट होतात, याकडे बीसीसीआयचे लक्ष असणार आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आयपीएल 2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून शानदार कामगिरी करणाऱ्या ऑफ स्पिनर वरुण चक्रवर्तीला ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टी -20 संघात स्थान मिळालं आहे. कसोटीमध्ये शुभमन गिलला कायम ठेवण्यात आले आहे.ऋषभ पंतला रिद्धिमान साहासह सामील करण्यात आलं आहे. अजिंक्य रहाणे कसोटी संघाचा उपकर्णधार असणार आहे. कसोटीत मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ असे दोन सलामीवीर पर्याय आहेत. तर केएल राहुल तिसरा पर्यायही आहे. मात्र राहुलचा अनुभव पाहता त्याला पसंती दिली जाऊ शकते.

असा आहे भारतीय संघ:

कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज

एकदिवसीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

टी -20 संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती