New ICC Cricket Rules: आयसीसीने क्रिकेट नियमात केले मोठे बदल; 1 ऑक्टोबरपासून होणार लागू

0
707

ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषकापूर्वी आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने क्रिकेटच्या नियमात काही मोठे बदल केले जाणार अशी घोषणा केली आहे. यामध्ये स्ट्राईक घेण्यापासून ते डेड बॉल, नो बॉल, पेनल्टी धावांपर्यंत अनेक मुद्यांवर नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासोबतच कोविड-१९ च्या काळापासून सुरू झालेली लाळ बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीचे नवे नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील. म्हणजेच पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक या नवीन नियमांच्या आधारे खेळवला जाईल.

सर्व नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील. या बदलांसाठीच्या सूचना मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) मांडल्या आहेत. साधारणपणे, आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सुचविलेले प्रत्येक नियम जसेच्या तसे लागू करते. असेच काहीसे यावेळीही पाहायला मिळाले.

आयसीसीच्या नव्या नियमांवर एक नजर

  • जेव्हा एखादा फलंदाज झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकवर खेळायला येईल.आऊट झालेल्या फलंदाजाच्या क्रीज बदलण्यानं किंवा न बदलण्याचा काहीच फरक पडणार नाही. यापूर्वी फलंदाज झेल बाद होण्यापूर्वी स्ट्राईक चेंज झाल्यानंतर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकवर यायचा.
  •  चेंडूवर थुंकी लावण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलीय. कोरोना महामारीच्या चेडूंवर थुंकी लावण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता हा नियम पुढं कायम ठेवण्यात आलाय.
  •  कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजाला दोन मिनिटांच्या आत स्ट्राइक घ्यावा लागेल. तर, टी-20 मध्ये त्याची वेळ मर्यादा 90 सेकंद आहे. यापूर्वी एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात येणाऱ्या दुसऱ्या फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन मिनिटे मिळायची. फलंदाज दोन मिनिटाच्या आत स्ट्राईक घेऊ न शकल्यास विरोधी संघाचा कर्णधार टाईम आऊटची मागणी करण्यास पात्र असेल.
  •  चेंडू खेळपट्टीबाहेर पडल्यास त्याला डेड म्हणून घोषित केला जाईल. तसेच फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडणारा कोणताही चेंडू नो-बॉल ठरवला जाईल.
  •  गोलंदाजाच्या गोलंदाजी (रनअप) दरम्यान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खेळाडूंकडून काही अयोग्य वर्तन किंवा जाणूनबुजून चुकीची हालचाल करण्यात आली. तर, पंच या चेंडूला डेड बॉल ठरवतील. तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात 5 धावा जमा होतील.
  • जर गोलंदाजानं गोलंदाजी करण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकर क्रीझमधून बाहेर पडला आणि गोलंदाजानं फलंदाजाला रनआऊट केल्यास त्याला बाद घोषित केलं जाईल. यापू्र्वी असं केल्यास अनफेयर प्ले मानलं जायचं.
  • टी-20 प्रमाणेच आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही षटक वेळेवर पूर्ण न झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 30 यार्डच्या आत अतिरिक्त एक फिल्डर ठेवावा लागेल.