प्रो कबड्डी लीग :यंदाच्या कबड्डी लीगचे आठवे पर्व लांबणीवर

0
284

यंदा कोरोनाच्या महामारीमुळे बर्‍याच क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेचे आयोजन रद्द करण्यात आले आहे, तर काही स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलण्यात आले. अशातच आता यंदा होणारा प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगामसुद्धा एक वर्षासाठी पुढे ढकलला, अशी माहिती प्रो कबड्डी आयोजकांनी दिली. दरवर्षी जुलै ते सप्टेंबरदरम्यान होणारी ही लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे, असे संयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदा सर्वच स्पर्धाचे वेळापत्रक कोलमडले आहे. संपर्काच्या क्रीडा प्रकारांना अद्याप परवानगी मिळाली नसल्याने प्रो कबड्डीने त्यांच्या जुलै ते सप्टेंबपर्यंतच्या नियोजित तारखा मागे टाकल्या आहेत. प्रो कबड्डीच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावर म्हटले आहे की, ‘‘करोनामुळे लागू करण्यात आलेली आरोग्यविषयक नियमावली आणि संपर्काच्या क्रीडा प्रकारांबाबत खेळाडूंच्या सुरक्षेबाबतचे धारण यांचा गांभीर्याने विचार करून आम्ही प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेत आहोत. याबाबत आम्ही चाहत्यांची दिलगिरी प्रकट करतो.

यावर्षी प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम खेळवण्यात येणार होता. प्रो कबड्डी लीगमध्ये प्रत्येक संघातील खेळाडूंचा एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क येतो. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही स्पर्धा एकवर्षासाठी पुढे ढकलली आहे. त्यामुळे प्रो कबड्डीचा ८ वा हंगाम पुढीलवर्षी पाहायला मिळू शकतो.

या स्पर्धेसाठी देशातील विविध शहरातील 12 संघाचा सहभाग असतो. आयपीएलच्या पाठोपाठ भारतात सर्वाधिक लोकप्रिय असणारी लीग म्हणून प्रो कबड्डीला ओळखले जाते. आयपीएल प्रमाणे या स्पर्धेत विदेशी खेळाडू सहभागी होतात. त्याचबरोबर यामध्ये राष्ट्रीय आणि देशांतर्गत कबड्डी खेळणारे खेळाडूसुद्धा सामील असतात.