इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा; पुण्यात रंगणार वन-डे सामने

0
225

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियासाठी पुढचं आव्हान तयार आहे. ४ कसोटी सामन्यांची मालिका संपवून भारतात परत आल्यानंतर टीम इंडियाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी, टी-२० आणि वन-डे अशी प्रदीर्घ मालिका खेळायची आहे. बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज या दौऱ्याची घोषणा केली. इंग्लंडचा संघ २०२० मध्ये भारत दौऱ्यावर येणार होता. मात्र करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता हा दौरा पुढे ढकलण्यात आला. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता बीसीसीआय प्रत्येक खेळाडूच्या तब्येतीची काळजी घेईल असं आश्वासन बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिलं आहे.

या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 4 कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नई तर उर्वरित 2 सामने हे अहमदाबादमध्ये खेळण्यात येणार आहेत. पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा डे नाईट असणार आहे. यातील दोन सामने चेन्नईत, उर्वरित दोन सामने आणि टी-२० मालिका अहमदाबाद तर वन-डे मालिका पुण्यात रंगणार आहे.

असं असेल इंग्लंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक –

५ ते ९ फेब्रुवारी – पहिला कसोटी सामना – चेन्नई
१३ ते १७ फेब्रुवारी – दुसरा कसोटी सामना – चेन्नई
२४ ते २८ फेब्रुवारी – तिसरा कसोटी सामना – अहमदाबाद (दिवस-रात्र)
४ ते ८ मार्च – चौथा कसोटी सामना – अहमदाबाद

टी 20 मालिका
पहिला सामना – 12 मार्च
दुसरा सामना – 14 मार्च
तिसरा सामना – 16 मार्च
चौथा सामना – 18 मार्च
पाचवा सामना – 20 मार्च

एकदिवसीय मालिका (पुणे)
पहिली मॅच – 23 मार्च
दूसरी मॅच – 26 मार्च
तिसरा मॅच – 28 मार्च