बर्थडे स्पेशल: टीम इंडियाला दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या गौतम गंभीरचा वाढदिवस

0
398

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरचा आज 39 वा वाढदिवस आहे. भारताचा निर्भीड सलामीवीर फलंदाज म्हणून गंभीरला ओळखले जाते. तो जसा मैदानावर निर्भीड आहे, तसाच तो मैदानाबाहेरही आहे. भारताला 2007 चा टी20 विश्वचषक आणि 2011 चा वनडे विश्वचषक मिळवून देण्यात गंभीरचा महत्त्वाचा वाटा आहे. या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात त्याने केलेली अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली होती.

एक चांगला क्रिकेटपटू असण्यासोबतच गौतम हा सच्चा राष्ट्रप्रेमीही आहे. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहून याचा सहज अंदाज लावता येतो. विविध समाजोपयोगी कामं आणि महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये गरज पडेलस तेव्हा त्याचं मोलाचं योगदान पाहायला मिळतं. क्रिकेटनंतर आता राजकारणातही गौतम गंभीर देशासाठी चांगले योगदान देत आहे. गौतम गंभीर जरि एक क्रिकेट खेळाडू असले तरी सामाजिक दृष्ट्या ही अत्यंत जागरूक माणूस आहेत. देशातिल अनेक महत्वपूर्ण मुद्दयांवर ते अनेकदा आपली प्रतिक्रिया कधी मिडियाद्वारे तर कधी ट्वीटर, फसबूकच्या माध्यमातून मांडायचे. कित्येकदा तर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यांच खुलेआम समर्थनही केले आहे तर कधी नरेंद्र मोदी यांची स्तुतिही केली आहे. मग २२ मार्च २०१९ ला त्यांनी लोकसभेच्या निवडणुका दरम्यान भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला व पूर्व दिल्लीतुन खासदार बनले.

कसोटी सामन्यात सलग पाच शतक ठोकण्याचा विक्रमही गंभीरच्या नावावर आहे. आतापर्यंत गंभीर ५७ सामने खेळला असून ४१२५ धावा त्याच्या नावावर आहेत. कसोटी सामन्यात गंभीरच्या नावावर ९ शतकं आणि २२ अर्धशतकं जमा आहेत. तर १४७ एकदिवसीय सामन्यात गंभीरने ११ शतकं आणि ३४ अर्धशतकं ठोकली आहेत.

गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या प्लेऑफसाठी पात्रता मिळविली आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी -२० मध्ये प्रथमच प्रवेश केला. अखेरीस त्याने चेन्नईच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून पराभव करून चॅम्पियन्सला पहिले जेतेपद मिळवून दिले. गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा अग्रगण्य धावा करणारा खेळाडू आहे. त्याच मोसमात त्याने आपल्या संघाकडून एकूण नऊपैकी सहा अर्धशतके झळकावली आणि २००० धावांचा टप्पा पार करुन स्पर्धेतील दुसर्‍या क्रमांकाची नोंद करणारा आयपीएल इतिहासातील दुसरा खेळाडू ठरला.

भारताला मोठे विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या गंभीरबद्दल या खास गोष्टी-

  • 14 ऑक्टोबर ला गंभीरचा दिल्ली येथे जन्म झाला.
  • त्याच्या जन्माच्या 18 दिवसांनतर त्याला त्याच्या आजी-आजोबांनी दत्तक घेतले. त्यानंतर तो त्यांच्याकडेच राहिला आणि लहानाचा मोठा झाला आहे.
  • गंभीरने 1999-00 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना अनेकांना प्रभावीत केले होते. त्याने पहिल्या दोन सामन्यातच 136 धावा केल्या होत्या.
  • त्यानंतर त्याचे 2000 मध्ये बेंगलोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये निवड झाली. तिथे भारतीय संघात स्थान मिळवण्याची क्षमता असणाऱ्या युवा क्रिकेटपटूंना ट्रेनिंग दिली जाते.
  • गौतमने २००३ मध्ये बांग्लादेशविरूद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. तिसऱ्या सामन्यात त्याने ७१ धावा करत सामनाविरचा किताब पटकावला होता.
  • 2007 ला झालेल्या वनडे विश्वचषकात गंभीरचा समावेश करण्यात आलेला नव्हता. पण त्यानंतर भारताने त्याला पहिल्या टी20 विश्वचशषकासाठी भारतीय संघात स्थान दिले. या विश्वचषकात मात्र गंभीरने दमदार कामगिरी करताना मालिकावीराचा पुरस्कारही मिळवला.
  • त्याने या विश्वचषकात अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 54 चेंडूत 75 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.
  • त्यानंतर चार वर्षांनी 2011 ला झालेल्या वनडे विश्वचषकातही अंतिम सामन्यातील गंभीरने केलेल्या 97 धावा आणि एमएस धोनी बरोबर केलेली 109 धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली होती. या विश्वचषकात तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होता.
  • गंभीरला 2008 मध्ये अर्जून पुस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच 2009 मध्ये त्याने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. त्याला यावर्षी आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कारही देण्यात आला होता.