अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे बुधवारी वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, मॅराडोनाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. २ आठवड्यांपूर्वीच त्याच्यावर मेंदूतील गाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मॅराडोनाने ३० ऑक्टोबरला आपला ६० वा वाढदिवस साजरा केला होता. चार फिफा विश्वचषकात खेळलेल्या मॅराडोनाने आपल्या नेतृत्वात 1986 मध्ये अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर ८ दिवसांत त्याला रुग्णालयात सुटी देण्यात आली होती. यानंतर तो घरीच विश्राम करत होता.
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर दोन आठवड्यांपूर्वी मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. १९८६ मध्ये जागतिक विजेता बनवल्यानंतर मॅराडोना अर्जेंटिनाचा आयकॉन बनला होता. क्लासिक १० क्रमांकाची जर्सी घालणारा मॅराडोना ड्रिबलिंग स्किल व गोल बनवण्याच्या क्षमतेमुळे संघात नेहमी प्लेमेकरची भूमिका बजावत होता. ५ फूट ५ इंच अशी कमी उंची असलेला खेळाडू मॅराडोना फुटबाॅलच्या जगात आपल्या २ गोलमुळे नेहमी चर्चेत राहिला. हे दोन्ही गोल त्याने १९८६ च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध केेले. तो क्वार्टर फायनल सामना अर्जेंटिनाने २-१ ने जिंकला होता. त्या सामन्यात मॅराडोनाच्या एक गोलला “हँड ऑफ गॉड’ व दुसऱ्याला फिफाने “गोल ऑफ द सेंच्युरी’ म्हटले. मेक्सिकोमध्ये झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने प. जर्मनीला ३-२ ने हरवले होते. त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडूला गोल्डन बूट मिळाला.
. फुटबॉलला आपल्याकडे अलीकडच्या काळात जेवढी लोकप्रियता आहे, तेवढी चार दशकांपूर्वी नव्हती. केबल टीव्ही, सॅटेलाइट वाहिन्यांचे आगमन झाले नव्हते आणि इंग्लिश प्रीमियम लीग, ला लिगा, सीरी ए, बुंडेस लीगा हे शब्द माहीत व्हायचे होते. फुटबॉलचा वर्ल्ड कप होतो, इतकीच सर्वसामान्यांना माहिती होती आणि त्यात रस असलेले त्याचे वृत्तांत वृत्तपत्रांतून वाचत होते. दूरदर्शनने १९८६ च्या फुटबॉल वर्ल्ड कपचा अंतिम सामना दाखवल्याचे पुसटसे स्मरते. त्या आधी फार तर कोलकात्यातील प्रसिद्ध क्लब मोहन बगान आणि ईस्ट बंगाल क्लबचा सामना कोणी दूरदर्शनवर पाहिला असेल, तर!… थोडक्यात, टीव्हीवर सामना पाहून फुटबॉलच्या प्रेमात पडलेल्या भारतीयांसाठी जागतिक पातळीवरचा पहिला आयकॉन, हिरो, चॅम्पियन होता, तो मॅराडोना.
महान फुटबॉलपटू पेले प्रमाणे १० नंबरची जर्सी मॅराडोना वापरत होता. त्याच्या आयुष्यात अनेक वादविवाद आणि चढउतार होते. ३० ऑक्टोबर १९६० मध्ये जन्मलेल्या मॅराडोनाने लहान वयात फुटबॉल खेळायला सुरवात केली आणि वयाच्या ११ वर्षी तो अर्जेंटिना ज्युनियर टीम मध्ये निवडला गेला. १९७६ पासून त्याने व्यावसायिक खेळाडू म्हणून करियर सुरु केले आणि राष्ट्रीय टीम मधला तो सर्वात युवा खेळाडू ठरला.
मॅराडोनाने पाहिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा गोल १९७९ मध्ये नोंदविला त्यावेळी तो ज्युनिअर विश्वकप खेळला होता. १९८२ मध्ये त्याने अर्जेंटिनाला विश्वकप मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होते. १९८६ मध्ये तो कप्तान झाला आणि विश्वकप खेळताना त्याने इंग्लंड विरुध्द दोन गोल केले होते. १९९१ मध्ये कोकेन सेवन केल्याच्या आरोपावरून त्याचे १५ महिन्यांसाठी निलंबन केले गेले होते. त्याने ३७ व्या वर्षी खेळातून निवृत्ती जाहीर केली होती.
२००० साली त्याने लिहिलेल्या ‘ यो सोया एल दिएगो ‘ या आत्मचरित्राला तुफान प्रसिद्धी मिळून ते बेस्टसेलर ठरले होते. त्याने प्रशिक्षक म्हणूनही दीर्घकाळ काम केले होते. तो २०१० मध्ये भारतात आला होता तेव्हा त्याने कोलकाता येथे फुटबॉल स्कूलची स्थापना केली होती.