भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १२ डिसेंबर १९८१ साली चंदिगड येथे झाला होता. युवराजने ऑक्टोबर २००३ मध्ये केनियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. युवराजला टीम इंडियाचा सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातं. टीम इंडियाने 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला. यामध्ये युवराजचे महत्वपूर्ण योगदान होते.
२००० ते २०१७ अशी तब्बल अठरा वर्ष त्याने भारतीय क्रिकेटसाठी दिली. निवृत्तीनंतरही, क्रिकेटशौकीन त्याला विसरले नाहीत. खरंतर, कधीच विस्मृतीत जाणार नाही अशी कामगिरीच युवराजने केली आहे. आपले चापल्ययुक्त क्षेत्ररक्षण, सहा चेंडूत सहा षटकार, २०११ वर्ल्डकपमधील लाजवाब प्रदर्शन आणि त्यानंतर कॅन्सरसारख्या आजारावर मात करत, पुन्हा त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेसा, असा हा प्रवास क्रिकेटप्रेमी विसरणे कसं शक्य आहे. युवराज सिंहच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील उल्लेखनीय कामगिरीवर आपण नजर टाकणार आहोत.
6 चेंडूत 6 सिक्स
19 सप्टेंबर 2007. वर्ल्ड कप टी 20 स्पर्धा (2007 T20 World Cup) टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना खेळण्यात आला. हा सामना लक्षात नाही असा कोणताच भारतीय क्रिकेट चाहता नसेल. त्याचं कारणही तसंच आहे. या सामन्यात युवराजने एकाच ओव्हरमध्ये म्हणजेच 6 चेंडूत 6 सिक्स खेचण्याची कामगिरी केली. सामन्यादरम्यान एंड्रयू फ्लिंटॉफबरोबर मैदानात शाब्दिक युद्ध रगंलं. याचा राग युवराजने स्टुअर्ट ब्रॉडवर काढला. स्टुअर्टच्या गोलंदाजीवर युवराजने 6 चेंडूत 6 सिक्स लगावले. यानंतर युवराजला ‘सिक्सर किंग’ अशी ओळख मिळाली.
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट
युवराजने 2011 मधील 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये अष्टपैलू कामगिरी केली. युवराजने वर्ल्ड कप 2011 च्या वर्ल्ड कप स्पर्धेचा हिरो ठरला होता. युवराजने या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली. युवराजने या वर्ल्ड कपमध्ये एकूण 9 सामने खेळला. यामध्ये त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 362 धावा केल्या. 113 ही त्याची या स्पर्धेतील सर्वोच्च कामगिरी राहिली. तसेच गोलंदाजीनेही त्याने कमाल केली. युवराजने एकूण 9 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या. 31 धावा देत 5 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती. त्याने ही कामगिरी आयर्लंड विरुद्ध केली होती. युवराजने केलेल्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
आयसीसी आयोजित स्पर्धेच्या अंतिम फेरीचे सहा सामने
युवराज हा आयसीसी आयोजित स्पर्धेच्या अंतिम फेरीत एक समान जास्त खेळला आहे. २००२ साली कारकिर्दीला प्रारंभ केलेल्या युवराजने आयसीसी आयोजित स्पर्धेच्या अंतिम फेरीचे सहा सामने खेळले आहे. त्यात २००२ चॅम्पियन्स ट्रॉफी, २००३ विश्वचषक, २००७ टी२० विश्वचषक, २०११ विश्वचषक, २०१४ टी२० विश्वचषक, आणि २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी अशा या अंतिम फेरी आहेत. तर धोनीने २००७ टी२० विश्वचषक, २०११ विश्वचषक, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी २०१४ टी२० विश्वचषक, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी असे ५ अंतिम सामने खेळले आहेत.
सर्वात वेगवान अर्धशतक
कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम हा सध्या युवराजच्या नावावर आहे. १२ चेंडूत त्याने हे अर्धशतक इंग्लंडच्या विरुद्ध २००७च्या विश्वचषकात केले होते. हा विश्वविक्रम सध्या तरी दुसऱ्या कोणत्याही खेळाडूंकडून मोडणे अवघड दिसत आहे.
युवराजची आतंरराष्ट्रीय कारकीर्द–
युवराजने आपल्या आतंरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये ४० कसोटी, ३०४ वनडे व ५८ टी२० सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ३३ पेक्षा अधिक सरासरीने युवराजने १९०० धावा केल्या आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये ३६ पेक्षा अधिक सरासरीने ८७०१ धावा व टी२० क्रिकेट मध्ये जवळपास २८ च्या सरासरीने ११७७ धावा केल्या आहेत. युवराजने गोलंदाजीत देखील उत्तम कामगिरी केलेली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ९, तर वनडे क्रिकेट मध्ये १११ विकेट मिळवल्या आहेत. टी२० मध्ये देखील युवराजने २८ बळी मिळवले आहेत