क्रिकेटमध्ये आजवर सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. विशेषत: गेल्या काही वर्षांमध्ये टी-२०च्या जमान्यात जिथे प्रत्येक चेंडूवर रन्स बनवणं आणि रन्स वाचवणं या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात, तिथे असे उत्तम क्षेत्ररक्षणाचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघांमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडू हरलीन देओलनं देखील अशाच प्रकारच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करत उत्कृष्ट कॅच घेतला.
इंग्लंडच्या डावातील 19व्या षटकातील 5व्या बॉलवर हरलीन देओल बाउंड्री लाइनवर होती. इंग्लंडची अॅमी जोन्स फलंदाजी करत असताना, तिने शिखा पांडेचा बॉलवर जोरदार शॉट मारला. चौकार जाणारा हा बॉलचा हरलीनने अद्भूतरित्या कॅच घेतला. यामुळे जोन्सला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. हरलीनने ज्या प्रकारे फिल्डींग केली ती आश्चर्यकारक होती.
हरलीनच्या कॅचला प्रतिस्पर्ध्यांचीही दाद
हरलीनची चित्त्यासारखी चपळाई पाहून अनेक जण अवाक झाले. भारताच्या खेळाडू तर एवढ्या खूश झाल्या की सारे जण तिच्या डोक्यावरुन हात फिरवून तिला शाबासकी देऊ लागले. एवढंच नव्हे तर इंग्लंडच्या संघातील महिला खेळाडूंनीही हरलीनचं टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केलं.
हरलीनच्या कॅचचे दिग्गजांकडूनही कौतुक
That was a brilliant catch @imharleenDeol. Definitely the catch of the year for me!pic.twitter.com/pDUcVeOVN8
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 10, 2021
Nope. Not possible. Couldn’t have happened. Must be some special effects trick. What? It was real? Ok, move over Gal Gadot; the real WonderWoman is here… pic.twitter.com/Cr9STZrVnW
— anand mahindra (@anandmahindra) July 10, 2021