आयसीसी क्रिकेट ‘हॉल ऑफ फेम’ काय आहे?

0
797

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने 2020 च्या आयसीसी हॉल ऑफ फेमची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिससह तीन दिग्गज खेळाडूंना हा सन्मान मिळाला आहे. या तीन दिग्गजांपैकी हॉल ऑफ फेम 2020 मध्ये एका महिला खेळाडूचे नावही आयसीसीने समाविष्ट केले आहे. कॅलिस व्यतिरिक्त आयसीसीने पाकिस्तानी अनुभवी झहीर अब्बास आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकरला हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले आहे.

आयसीसी हॉल ऑफ फेम 2020 च्या इंडक्टिसची घोषणा अ‍ॅलन विल्किन्स, सुनील गावस्कर आणि मेल जोन्स यांनी केली. आयसीसी हॉल ऑफ फेम पुरस्काराच्या सुरूवातीस अद्याप फारसा कालावधी झालेला नाही, परंतु आयसीसीकडून 90 खेळाडूंना हा सन्मान देण्यात आला आहे. गेल्या वर्षी क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकरसुद्धा आयसीसी हॉल ऑफ फेमसाठी निवडले गेले होते. केवळ पुरुषच नाही तर महिला क्रिकेटपटूंनाही हा सन्मान देण्यात आला आहे.

आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’ काय आहे?

‘आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’ एक असा समुह आहे. क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत त्यांना सन्मानित करणे हा याचा उद्देश आहे. आयसीसीने ‘फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन’च्या मदतीने हा पुरस्कार सुरु केला होता. सुरुवातीला या यादीत 55 खेळाडूंचा सहभाग होता. या सुरुवातीच्या यादीत सर डॉन ब्रॅडमन, एलन बॉर्डर आणि इमरान खान यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. अन्य देशांच्या तुलनेत हॉल ऑफ फेममध्ये ब्रिटीश खेळाडूंची संख्या अधिक आहे. त्यानंतर दरवर्षी या समुहात नव्या प्रतिभावान खेळाडूंचा समावेश केला जातो. आयसीसीच्या या पुरस्कारांच्या दरम्यान दर वर्षी नवीन सदस्यांचा समावेश केला जातो. आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेमच्या सुरुवातीच्या यादीमध्ये डब्ल्यू जी ग्रेस, ग्रॅहम गूच, बॅरी रिचर्ड्स यांचा समावेश आहे.

आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये खेळाडूने निवृत्ती घेतल्याच्या 5 वर्षानंतर सामिल केले जाते. भारतामधून हॉल ऑफ फेममध्ये माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनील गावसकर, अनिल कुंबळे,राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे.

ICC Hall of Fame मध्ये स्थान मिळवलेले दिग्गज भारतीय खेळाडू –

१) बिशनसिंह बेदी – २००९

२) सुनिल गावसकर – २००९

३) कपिल देव – २००९

४) अनिल कुंबळे – २०१५

५) राहुल द्रविड – २०१८

६) सचिन तेंडुलकर – २०१९